मंगळवेढा (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम म्हणजे शालेय विद्यार्थामधून सक्षम व मजबूत युवा पिढीची पायाभरणी होत असल्याचे प्रतिपादन आ. समाधान आवताडे यांनी व्यक्त केली.
20 ते 25 जानेवारी दरम्यान शालेय स्तरावर आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्याचे पारितोषिक वितरण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा यावर विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद
इंग्लिश स्कूल मध्ये पार पाडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रा येताळा भगत, नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दिगंबर यादव,विस्ताराधिकारी पोपट लवटे, प्रशासनाधिकारी शाहू सतपाल, केंद्रप्रमुख ईश्वर भोसले विश्वासराव आवताडे,पी.जी राठोड, सुनील नागणे, सहशिक्षक आकुंजी, माने, धनसिंग चव्हाण, उमेश माळी, जमील काझी, आदी मान्यवर विविध शाळां मधील शिक्षक, भाजपा विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की,शालेय स्तरावरील या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अचूक कुंचल्यातून रेखाटन केलेल्या नेत्रदिपक चित्रांचे आणि कलेच्या समर्पक भाव निरागस कौशल्यांचे मला विशेष कौतुक आणि त्यांच्या कलेचा अभिमान आहे. शालेय पातळीवर व कॉलेज जीवनामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला कौशल्य दाखविण्यास प्रोत्साहन देत असतात. सुत्रसंचालन संजय दवले यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. बक्षीस वितरण समारंभा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहावी ते बारावी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या विषयावर त्यांनी ऑनलाईन संवाद साधला
—–
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील 9500 विद्यार्थी सहभागी झाले.त्यामध्ये सानिया हिदायत मुजावर (प्रथम), कु. श्रद्धा मारुती निकम( द्वितीय ),कु. धनश्री भारत सरगर (तृतीय),यांना प्रत्येकी 15 हजार,10 हजार,5 हजार अशी रोख बक्षीसे तर, 10 विद्यार्थ्यांना एक्सलंट वॉरियर्स म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये, तसेच 32 स्पर्धक विद्यार्थ्यांना सुपर वॉरियर्स म्हणून प्रत्येकी 1 हजार रुपये अशी उत्तेजनार्थ बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.