….विधानसभेकडून लोकसभेकडे लक्ष्मणाची धाव आहे!

मंगळवेढा(प्रतिनिधी) कमळाच्या प्रत्येक पाकळीवर प्रभू श्रीरामाचे नाव आहे,विधानसभेकडून लोकसभेकडे लक्ष्मणाची धाव आहे या कवितेतून कवी शिवाजी सातपुते यांनी सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेवर लक्ष्मण ढोबळे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावेदार असल्याची कवितेतून मांडली. शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कविसंमेलनाचे आयोजन केले होते.कविसंमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे, औदुबर वाडदेकर, भारत पाटील,हजरत काझी, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे,मनिषा सानप, प्राचार्य चिदानंद माळी, विश्वंभर काळे, कृष्णदेव चौगुले, कांतीलाल इरकर बसवराज कोरे, शशिधर पाटील दादासाहेब वाघमारे आधी उपस्थित होते कविसंमेलनात नारायण पुरी, अविनाश भारती, शिवाजी बंडगर,अनंत राऊत, खलील मोमीन, डी.के.शेख, नितीन चंदनशिवे,भरत दौंडकर ,शिवाजी सातपुते, रमजान मुल्ला, आणि तालीब सोलापूरी हे सहभागी झाले.                                                  सांगोल्याचे कवी शिवाजी बंडगर यांनी ओय साहेब लागू द्या पाय,अनुभव घ्यावा कशीय शेतीय या कवितेतून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांला शेती करतानाचा अनुभव आणि शासकीय उपाययोजनेचा कागदोपत्री अंमलबजावणीवर आधारीत खदलाबदली या शेतकरी प्रश्नावर कवितेतून आवाज उठविला.  आबा पाटील यांनी सध्याच्या राजकीय नेत्याच्या पक्षांतरावर नेम नाही आमचा नेता कुठल्या पक्षात हाणील उडी म्हणून आम्ही खिशात सगळे झेंडे ठेवले घालून घडी ही कविता सादर केली.                          तालीब सोलापूरी यांनी घरातील पत्नीच्या हुकूमशाहीवर मेरे आगे क्यो रोता है,आखो मे पानी मत लाना.इश्क मे मत जादा उचलना,हु बोलने क्या,और लेकर चलने क्या ,
तारे मंगेगी,तो सिदा घरको आणा!                              रमजान मुल्ला यांनी अंतराच्या किंकाळीने बधीर झालो, बुका झालो गुलाल झालो अबीर झालो ,मला वाटले चोखोबा कबीर झाले.                                            नितीन चंदनशिवे यांनी हरवलेल्या प्रियकराची अवस्था व अनेक पक्षाकडे फिरणाऱ्या नेत्याची अवस्था कवितेतून दाखवून दिली.                                          कवि प्रा.सुरेश शिंदे यांनी सध्याच्या परिस्थितीत अनेक नेते सत्तेसाठी कोणतेही पक्षात उड्या मारतात त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न निर्माण होतात त्यावेळी कलावंत हा जनतेचे प्रश्न मांडू शकतो. तत्पुर्वी ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित नाटक वास इस दास ही नाटीका सादर करण्यात आली.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.