मुंबई-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सूरू आहेत. लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. यासह आता 4500 रूपये नेमके महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. येत्या 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र 19 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील.
‘या’ महिलांना फक्त 1500 मिळणार?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यातस जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.