कोळी समाज हा प्रामाणिक आणि कष्टाळू आहे – माजी आ. नरेंद्र पवार
कोळीवाडा येथील गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त नरेंद्र पवारांचे प्रतिपादन
कल्याण पश्चिम येथील कोळीवाडा येथे कराडी कोळी समाज विश्वस्त मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ आयोजित श्री गणेश मंदिराचा दहावा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. कोळी वाड्यातील शेकडो बांधवांनी एकत्रित येत सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. मोठ्या आनंदात हा वर्धापन दिन पार पडला.
कोळी समाज हा अत्यंत प्रामाणिक आहे, गेली अनेक वर्षे समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करत आहे, नागरिकांची खवय्येगिरी जपण्यासाठी हा समाज काम करतो, वर्षातून एकत्र येत मोठ्या उत्साहात गणेश मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जात असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडी चे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले. दरम्यान “I LOVE कल्याण कोळीवाडा” या सेल्फी पॉईंटचे उद्घाटनही माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी यावेळी कृष्णा भगत, अंकुश शेलार, शंकर शेलार, दामोदर शेलार, योगेश शेलार, नरेश शेलार, राजेश भोईर, प्रमोद भगत, बाळा शेलार, मयुर भगत, विकी शेलार, संतोष शेलार, श्रेयस भगत, कमल्या भोईर आतिश भगत, शांताराम भोईर, श्याम भोईर, जय भोईर, सूरज घासे, हर्षल भगत, पद्माकर शेलार, मनिष शेलार, शिवम शेलार, श्याम कोळी, राजा भगत, सुरेखाताई भगत, संगीता भगत, निमाबाई घासे, मालतीताई भोईर, भावनाताई भोईर, मालतीताई भगत, इंदुताई शेलार, दुर्गाताई शेलार, आशाताई भोईर आदी. कोळीबांधव व कोळीभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.