पंढरपूरमंगळवेढासोलापूर

कर काटा कुटूनबि;अन् आण ऊस विठ्ठलवरी! काटा कुठूनही करून आणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केलेले आव्हान ठरले खरे!

श्री विठ्ठल कारखान्याचा काटा चौक वैद्यमापन विभागाच्या भरारी पथक तपासणीत शिक्कामोर्तब

पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काल वैद्यमापन विभागाची अचानक भरारी पथक आले असता त्यांनी केलेल्या तपासणीत पथकास कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर असल्याचे आढळून आले, त्यामुळे वजनात कोणताही गैरप्रकार नसल्याचे भरारी पथक व वैद्यमापन अधिकार्‍याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
चेअरमन अभिजीत पाटील यांनी सतत आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना विश्वास देत होते की, काटा कुठूनही करून या, शेतकऱ्यांच्या ऊसाचा काटा मारणार नाही असा प्रामाणिक विश्वास देत होते. त्यावर दिनांक १७जानेवारी२०२३ रोजी वैद्यमापन पथकाने अचानक भेट देऊन शिक्कामोर्तब करण्यात केले आहे. चेअरमन अभिजीत पाटलांनी कोणालाही न जुमानता भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे त्यांची आर्थिक उन्नती होऊन शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत याकरता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ प्रयत्न करीत आहेत.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेली २ ते ३वर्षे बंद अवस्थेत असताना सुरू करणे हे तगडे आवाहन होते. त्या आवाहनाला सामोरे जात कारखान्याने १५ जानेवारी पर्यंत ५लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.तसेच मागील हंगामातील शेतकऱ्याची थकीत देणे देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. वैद्यमापन विभागाच्या तपासणीत कारखान्याच्या काट्यावर कोणताही गैरप्रकार प्रकार अथवा वजनात तफावत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे वैद्यमापन विभागाच्या भरारी पथकाने देखील कारखान्याच्या प्रशासनाचे कौतुक केले आहे.

काटा कुठूनही करून या असे चेअरमन व संचालक मंडळांनी जाहीर केल्याने श्री विठ्ठल कारखाना हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. नेहमीच शेतकऱ्यांच्या विश्वासाला जपत असल्याने ५ लाख मे.टन गाळप यशस्वी करू शकलो असे कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक डी.आर गायकवाड यांनी सांगितले.

वैद्यमापन तपासणी पथकामध्ये निरीक्षक वैद्यमापन शास्त्र सी.बी गायकवाड, महसूल नायब तहसीलदार पंडित कोळी, लेखापरीक्षक श्रेणी१ पी.आर.शिंदे यांचेसह शेतकरी प्रतिनिधी अमोल विठ्ठलराव रणदिवे, सिताराम रणदिवे तसेच कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक, वर्क्स मॅनेजर व केनयार्ड सुपरवायझर उपस्थित होते…

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close