सोलापूर(viral news): कोंबडीने अंड देते ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, एका कोंबडीने चक्क साडेतीन इंचाचं अंड दिल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. सोलापूर शहराजवळ असलेल्या बाळे परिसरातून हा प्रकार उघडकीस आला आहे.येथील एका देशी कोंबडीने भलं मोठं अंड दिलं आहे. अंड्याचा आकार पाहून कोंबडीचे मालक दशरथ दंदाडे यांना धक्काच बसला आहे. तसं पाहता कोंबडी नेहमी २ सेंटिमीटरचे अंड आहे. मात्र, दशरथ दंदाडे यांच्या कोंबडीने चक्क साडेतीन इंचाचं अंड दिलं आहे. ही माहिती परिसरातील नागरिकांना कळताच, त्यांनी हे अंड पाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. खुरड्यातून अंडी बाहेर काढताना ही बाब निदर्शनास आली.
दशरथ यांनी ताबडतोब घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली आणि अंड दाखवलं. एवढं मोठं अंड पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. शेजारच्या नागरिकांना देखील कुतूहल वाटले. कोंबडीन दिलेल्या भल्यामोठ्या अंड्याची माहिती वाऱ्यासारखी सोलापुरात पसरली.शहरातील अनेक जण जाऊन साडेतीन इंचाचं अंड पाहत आहेत. हे भलं मोठं अंड फ्रीजमध्ये सांभाळून ठेवण्यात आलं आहे. साडे तीन इंचाच्या अंड्यात डबल बलक असावं अशी शक्यता कोंबडीचे मालक दशरथ यांनी वर्तवली. अजूनही ते अंड फोडलेलं नाही.
घरात असलेल्या २० कोंबड्या अशा प्रकारचं मोठं अंडं देऊ शकतात का, याचा अभ्यास करत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिन्यातून १० ते १२ दिवस किंवा कधीकधी १५ दिवस देशी कोंबड्या अंडी देतात. सोलापुरातील विविध पोल्ट्री चालकांशी संपर्क करून अभ्यास सुरू असल्याची माहिती दशरथ दंदाडे यांनी बोलताना दिली.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.