मंगळवेढा(प्रतिनिधी) प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणे आवश्यक आहे. आगामी १५ दिवसांत हे सर्व लावावेत अन्यथा या रुग्णालयाना शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयाना दिला आहे शिवसेना (उबाठा)शहरप्रमुख दत्तात्रय भोसले यांनी याबाबत निवेदन प्रांताधिकारी यांना दिले
या निवेदनात त्यांनी लिहले आहे की सर्दी, ताप, खोकला आल्यानंतर रुग्ण खासगी रुग्णालयात जातात. तेथे गेल्यावर त्यांच्या रक्त, लघवी आदी तपासण्या केल्या जातात. आजार छोटा असतानाही एवढ्या तपासण्या का, असा सवाल रुग्ण उपस्थित करीत असतात, परंतु वरुन साधा दिसणारा आजार तपासणी केल्यावर मोठा असल्याचे उघड होत असते. तसेच अनेकदा डॉक्टरांनी काहीच तपासणी न करताही जास्तीचे पैसे घेतल्याचे आरोप होतात. यामुळे वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाइक आक्रमक होत डॉक्टर किंवा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मारहाण करतात.हे टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागातच दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावण्याची गरज आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनीभागात दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक असून याची गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे
यावेळी शहर प्रमुख दत्तात्रय भोसले उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने शहर उपप्रमुख प्रतीक होडगे समन्वयक गणेश कुऱ्हाडे उपस्थित होते
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.