आपली काॅलर टाईट करण्यासाठी खासदार व आमदार काॅग्रेसचा होणे गरजेचे-आ.प्रणिती शिंदे

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढ्यात काॅग्रेस पदाधिका-याची काॅलर टाईट करण्यासाठी खासदार व आमदार काॅग्रेसचा होणे गरजेचे आहे.मंगळवेढ्यातील लोकप्रतिनिधींकडून न सुटलेले प्रश्न येत्याअधिवेशनात मांडणार असल्याची ग्वाही आ.प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा काॅग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे,तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,अॅड अर्जुनराव पाटील,राजेद्र चेळेकर,मारुती बापु वाकडे,रविकिरण कोळेकर,शिवशंकर कवचाळे,आदी उपस्थित होते.                                                                        यावेळी बोलताना आ.शिंदे म्हणाल्या की,अवघड असलेल्या शहर मतदारसंघात अधिक लक्ष देण्याची गरज असल्याने या लोकसभा मतदारसंघात फिरू शकली नाही यांची खंत व्यक्त करून येणाऱ्या निवडणूकीसाठी काॅग्रेसच्या मतात वाढ होण्यासाठी माझ्याकडून जेवढे शक्य आहे तेवढे करण्यास कमी पडणार नाही.                                                काॅग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा,शेतकऱ्याचा,कष्टक-याचा पक्ष असून त्या पक्षात हुकूम शाही चालत नाही.आगामी निवडणूकीसाठी बुथ समिती स्थापन करण्याची गरज आहे त्याची तयारी आज पासून तयारी करावी.यापुढील काळात मी थेट लोकात जाणार आहे.कार्यकर्त्यानी पक्ष तुमचा आहे या भावनेने वागले पाहिजे. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत तीन राज्यात काॅग्रेसची सत्ता येईल असा दावा करून काॅग्रेस पदाधिकाय्राचे हाल सुरू आहेत हे नाकारत नाही.सध्या भाजपला सगळे वैतागले पण बोलत नाहीत,वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवानंतर पणौतीचा नवीन ट्रेड सुरू झालाय.

मनोज माळी म्हणाले की, ज्वारीवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करणारे उद्योग निर्माण झाले पाहिजे,भिमराव मोरे म्हणाले की,सत्तेत नसल्यामुळे अधिकारी सर्वसामान्याची कामे करत नाही,बुथ कमिट्या तयार करून पक्ष बांधणी करणे गरजे आहे.                                                                           प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की, तालुक्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजना,प्रांत कार्यालय, तालुक्यासाठी स्वतंत्र दुष्काळाचा जी.आर. हे प्रश्न काँग्रेसने सोडवले आहेत नंतरच्या काळात झालेल्या सत्ता बदलामुळे हे प्रश्न तसेच रखडलेले आहे या प्रश्नावर काँग्रेस नेतृत्वाने आवाज उठवण्याची गरज आहे.विविध सेलच्या निवडी केल्या असून  तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यासाठी शहरात अध्यायावत कार्यालय कायम खुले ठेवले आहे.                                                                                  काँग्रेस पक्षासाठी योगदान दिलेल्या अनेक नेत्यांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आले.                        या बैठकीस दादा पवार ,भीमराव मोरे ,पांडुरंग निराळे ,विष्णु शिंदे सर, दीपक सदाबसे, दादासो ढेकळे,कल्लाप्पा पाटील, बाबुराव पाटील, दिलीप जाधव ,पांडुरंग जावळे,मुबारक शेख ,सुलेमान तांबोळी, सत्तार भाई इनामदार, जयश्री कवचाळे, नाथा ऐवळे ,सुनीता अवघडे, भीमराव कांबळे,बापू अवघडे,अॕड.राजू बामणे ,पांडुरंग निराळे,बाबुराव पाटील ,आयेशा शेख, बजरंग चौगुले,सुरेश पवार,आबा पाटील, संतोष शिरसागर, राजन ठेंगील, शहाजी कांबळे ,बंडोपंत खडतरे, शिवदास पुजारी, रविराज खडतरे ,आकाश भोसले, सचिन कोळेकर, संग्राम दुधाळ, राजाराम पाटील, विलास शिलेदार ,फारुख मुजावर, सैफन शेख ,तसलीम आकुंजी, रवींद्र शिवशरण म्हाळाप्पा शिंदे, अजय आधाटे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.