मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा तालुक्यात महावितरण कडून सक्तीने सुरू असलेली विज बिल वसुली व वीज तोडणी त्वरित थांबवावी अशा सूचना महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली
सध्या राज्यभरात महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिलासाठी वसुली मोहीम राबवली जात आहे याचा फटका सर्वसामान्य शेतकरी वर्गाला बसत असून सध्या द्राक्ष, डाळिंब व इतर पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीकडून विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करून वीजबिलासाठी अडवणूक केली जात आहे त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. सध्या मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात उजनी कॅनॉल,भीमा, माण नदीला पाणी सोडल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे हाता – तोंडाशी आलेली पिके जलून जात आहेत ही पिके हातची जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे महावितरण कंपनीने थकबाकीसाठी सुरू केलेली वीज बिल वसुली, शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम थांबवावी तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आमदार समाधान आवताडे यांच्याकडे मांडल्या तसेच सध्या आमदार अवताडे यांच्या विचारांचे सरकार असल्याने त्यांनी याबाबत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेत आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांवरील अन्यायकारक व शक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवून विज तोडणी करू नये, शेतकऱ्यांना विज बिल भरण्यासाठी मुदत द्यावी तसेच शेतकरी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने विज बिल वसुली करावी अशा सूचना दिल्या आहेत तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरण कंपनी स्वस्त दरात वीज देत असून शेतकऱ्यांनी देखील पूर्णतः मोफत वीज वापरण्याऐवजी काही प्रमाणात विज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करणे गरजेचे आहे वीज बिल वसुलीमुळे शेतकरी वर्गाला विजेच्या संदर्भात चांगल्या पायाभूत सोयी सुविधा मिळणार आहेत तसेच महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होण्यास मदत होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील महावितरण टिकली पाहिजे या दृष्टीने थोड्याफार प्रमाणात का होईना विज बिल भरून सहकार्य करावे व विजेचा अतिरिक्त वापर न करता गरजेपुरता वापर करून वीज बचत करावी, तसेच सक्तीने कोणी अधिकारी वीज बिल वसुलीसाठी मुद्दामहून त्रास देत असेल तर आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.