दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्याधुनिक सुविधा असलेल्या एम्स रूग्णालयाचे उद्घाटन केले.पंतप्रधानांनी जुलै 2017 मध्ये या रुग्णालयाची पायाभरणी केली होती, हे रूग्णालय प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे.एम्स नागपूर हे रूग्णालय 1575 कोटी खर्च करून उभारण्यात आले आहे.
ज्यामध्ये ओपीडी, आयपीडी, निदान सेवा, ऑपरेशन थिएटर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख विशेष आणि सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभाग आहेत. हे रुग्णालय महाराष्ट्राच्या विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी उभारण्यात आले आहे. गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाटच्या आसपासच्या आदिवासी भागांसाठी हे एक वरदान ठरणार आहे. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी एम्स, नागपूर येथील प्रदर्शनाचीही पाहणी केली.आज तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील नागपूर आणि छत्तीसगडच्या बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या सहाव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.