मंगळवेढा (प्रतिनिधी) धनश्री परिवार व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळ्या निमित्त दामाजी रोड, मंगळवेढा येथे दि. १९ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे.
सायंकाळी ४ वा, धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळा व अमृतमहोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचेसह जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व कारखान्याचे चेअरमन, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. शिवाजीराव काळुंगे, अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.