मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष व स्व.आमदार भारत नाना भालके गटाचे समर्थक समर्थक संजय बंदपट्टे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात सोलापूरचे जिल्हा प्रमुख प्रा.शिवाजीराव सांवत यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे प्रवेश केला. पक्षाने लगेच संजय बंदपट्टे जिल्हा संघटक पदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविले. यावेळी पंढरपूरचे विभागाचे जिल्हा प्रमुख जीवन चवरे,युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे,उप शहर प्रमुख धनंजय सुतार,धनंजय पाटील, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे पंढरपूर विभाग जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले,सोमनाथ देवकर,सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संजय बंदपट्टे बोलताना म्हणाले ,पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्वात आधी समाजकार्य नंतर राजकारण हा हेतू उद्देश आपल्याला आवडल्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. लवकरच आरोग्यमंत्री तानाजी सावंत, जिल्हा प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रमुख राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माझ्या संपर्कातील जवळपास सहा नगरसेवक व राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक पदाधिका-याचा प्रवेश करून शहरच्या विकासा बरोबर पक्ष वाढीचे प्रयत्न करणार आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.