मंगळवेढा(प्रतिनिधी) डोणज येथे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियाचे घर फोडून चोरटयांनी रोख रक्कम,सोन्याचे दागिने,विक्रीस आणलेले कपडे,स्टेशनरी साहित्य असा एकूण 1 लाख 49 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी अंकिता सलवदे हया त्यांच्या कुटुंबासह दि.12 जानेवारी रोजी सायंकाळी 4.00 वा. घराला कुलूप लावून औरंगाबाद येथे ते कामानिमित्त गेले होते.दरम्यान,त्यांचा तेथे दोन दिवस मुक्काम पडल्याने ते दि.15 रोजी सकाळी 7.00 वा. डोणजकडे येत असताना सोलापूरला आल्यावर शेजारी राहणारे मनोज सलवदे यांनी फोन करून फिर्यादीच्या पतीस सांगितले.तुमच्या घराचे कुलूप कोणीतरी तोडलेले आहे. तसेच घराचा दरवाजा उघडाही आहे.डोणज येथे पोहोचल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीने घराची पाहणी केली असता कुलूप तोडलेले व घरातील कपाट उघडे दिसून आले.कपडे अस्ताव्यस्त पडलेले तसेच लॉकर तुटलेले दिसून आले.यामध्ये 40 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण,12 हजार रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची ठुशी,4 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याची मनगटी चेन,8 हजार रुपये किमतीचे दोन गॅ्रम वजनाच्या कानातील रिंगा,55 हजार रुपये किमतीचे विक्रीस आणलेल्या साडया व लहान मुलांचे कपडे,5 हजार रुपये किमतीचे स्टेशनरी साहित्य,25 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 49 हजाराचा मुद्देमाल चोरटयाने चोरून नेल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान त्याच रात्री डोणज गावामध्ये चोरटयांनी 5 घरफोडया करण्याचा प्रताप केला असून अन्य घरामध्ये चोरटयांना काही सापडले नसल्याने त्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.