मंगळवेढा(प्रतिनिधी) दामाजी कारखान्यावरील कर्जाबाबत माजी संचालक सुरेश भाकरे यांनी केलेले आरोप निराधार असून सध्या कारखान्यावर 178 कोटी 39 लाख मुद्दल व त्यावरील व्याज इतके कर्ज असून 10 वर्षे संचालक असूनही आपणाला अहवालातील माहिती समजत नसेल तर आपणास अवगत तज्ञ लेखापरीक्षकांकडून अवगत करून घ्यावी असे प्रतिउत्तर विद्यमान संचालक दिगंबर भाकरे यांनी दिले.
समविचारी आघाडीच्या नेतृत्वाखालील दामाजी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने कारखान्याच्या अहवालात 200 कोटी कर्जाचा कुठेही उल्लेख नसल्याने समविचारी आघाडीने निवडणूक प्रचारात केलेले आरोप धांदात खोटे असल्याचे त्यांनी सिद्ध झाल्याचे माजी संचालक सुरेश भाकरे यांनी सांगितले, याशिवाय इतर काही कारभारावर त्यांनी आरोप व प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्या आरोपाला विद्यमान संचालक दिगंबर भाकरे यांनी प्रतिउत्तर देत म्हणाले की, 31 मार्च 22 या आपल्या कार्यकाळातील आकडेवारी नमूद आहे. तीच आकडेवारी अभ्यासपूर्ण व डोळे उघडे ठेवून पाहून घ्यावी .आपल्या काळात ज्या बँकेकडून जी कर्जे आपण घेतली त्या कर्जावरील व्याजाची तरतूद आपण कुठेही केली नाही.तसेच कर्जाची आकडेवारी स्पष्टपणे अहवालामध्ये आहेत.
परिशिष्ट 4 :- 31 मार्च 22 अखेर 38 कोटी 77 लाख
परिशिष्ट 5 :- 1 कोटी 19 लाख
परिशिष्ट 6 :- 2 कोटी 62 लाख
परिशिष्ट 7 :- 3 कोटी 25 लाख
परिशिष्ट 8 :- 112 कोटी 83 लाख असून त्यानंतरचे आपल्या कार्यकाळातील बँक व इतर अॅडव्हांस खालीलप्रमाणे
यशोदा पतसंस्था 3 कोटी 23 लाख,मोलेसेस 11 कोटी
साखर विक्री अॅडव्हांस 5 कोटी 50 लाख, असे 178 कोटी 39 लाख मुद्दल व आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात या कर्जाच्या रकमेवरील व्याज तरतूद केलेली नाही या रकमेची व्याजाची रक्कम काढली असता जवळपास 40 कोटी रु रक्कम व्याज देणे शिल्लक आहे. याचा अभ्यास आपण तज्ञ लेखा परीक्षकाकडून अवगत करून घ्यावे तसेच खाजगी व्यापाऱ्याकडून वार्षिक 36 % व्याज दराने एकूण 16 कोटी 50 लाख रु कोणी आणि कशासाठी इतक्या व्याजदराने घेण्यात आले याचा खुलासा माजी संचालक व कारखान्याचे हितचिंतक म्हणून आपणास माहित नसेल तर माहिती करून आपण खुलासा करावा जर आपल्याला वरील माहिती खोटी वाटत असेल तर आपण आपल्या कारखान्यावरती येवून समोरासमोर चर्चा करावी आपण दिलेली माहिती 40 हजार सभासदाची फसवणूक व दिशाभूल करणारी असून आपण एका नामवंत जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कामकाज केले असल्याने अशा प्रकारचे न समजणे इतपत अडाणी सारखे बोलून सभासदाचे रोष ओढवून घेऊ नये. असे प्रत्युत्तर माजी संचालक भाकरे यांच्या आरोपाला विद्यमान संचालक भाकरे यांनीच दिले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.