मंगळवेढा (प्रतिनिधी) तुम्ही मतदारानी या निवडणुकीची एक लढाई माझ्यासाठी करावी पुढची लढाई मी तुमच्यासाठी लढेन असे सांगून मला संधी मिळाल्यास लोकसभेत पहिला आवाज हा शेतकऱ्याचा असेल असा सवाल उमेदवार काँग्रेसचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील मरवडे येथे बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी आज बोराळे मरवडे हुलजंती गावाच्या दौऱ्यात मरवडे येथे बोलताना व्यक्त केले यावेळी कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार ,रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा,तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,शिवसेनेचे प्रा.येताळा भगत,राष्ट्रवादीचे चंद्रशेखर कौडूभैरी,प्रथमेश पाटील,रविकरण कोळेकर,हणमंत दुधाळ,फिरोज मुलाणी,साहेबराव पवार,पांडुरंग चौगुले,पांडुरंग जावळे,दौलत माने,दादा पवार,साहेबराव पवार, मनोज माळी, राजाराम जगताप, तुकाराम भोजने,अजय अदाटे ,पांडुरंग निराळे,बापू अवघडे आदीसह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ शिंदे म्हणाल्या की देशातील अर्थकारण हे शेतकऱ्यांच्या जीवावर असून शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे अस्तित्व संपण्याची काम सत्ताधाऱ्याकडून सुरू आहे, त्यानी महागाई वाढवली, दुधाचा प्रश्न मार्गी लावला नाही, पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, गुजरातचा कांदा परदेशात पाठवत महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात बंदी का ? असा सवाल करून अंबानी अदानीसह पाच ठेकेदाराचे हित पाहण्याचे काम सुरू आहे. दहा वर्षात काय काम केले यावर न बोलता जात,धर्म,पात, हे मुद्दे काढून निवडणुकीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही मतदारानी या निवडणुकीची एक लढाई माझ्यासाठी करावी पुढची लढाई मी तुमच्यासाठी लढेन असे सांगून मला संधी मिळाल्यास लोकसभेत पहिला आवाज हा शेतकऱ्याचा असेल. पांडूरंग चौगुले म्हणाले की,भारताच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली.निवडणूकीच्या तोंडावर मंगळवेढा उपसा सिंचन योजना माण नदीवरील बॅरेज वगळून पाणी मंजुरी गाजर दाखवले.चंद्रशेखर कौडूभैरी म्हणाले,दहा वर्षात दोन खासदारांनी लोकसभेत एकही प्रश्न मारून तडीस नेला नाही.यंदाच्या निवडणुकीत चांगला लोकप्रतिनिधी लोकसभेत जाणे आवश्यक आहे.
Check Also
Close