मंगळवेढा (प्रतिनिधी)प्रत्येकाच्या कुटुंबातील महिलेचे आरोग्य उत्तम असेल तर सर्व कुटुंब निरोगी राहिल.व ते घर स्वर्ग बनेल असे मत प्राचिन भारतीय सांस्कृतिक विद्या केंद्र, कोल्हापूरचे आचार्य नारायण गुरूजी यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा व शिवशंभो महिला पतसंस्थेच्या वतीने चेअरमन तेजस्विनी कदम यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेमध्ये शनिवार दिनांक १२.०३.२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम,संचालिका डॉ.मिनाक्षी कदम,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम,चेअरमन तेजस्विनी कदम ,यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन निलाताई अटकळे ,अंजली आवताडे, शेराॅन ढोबळे, सहसचिव श्रीधर भोसले ,संचालिका अजिता भोसले,कृषीभुषण अंकुश पडवळे, नवीन साळुंखे कोल्हापूर आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व स्व. कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व उपस्थित महिलांना फेटा ,शाल व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
आचार्य नारायण गुरूजी म्हणाले,आपली प्राचीन भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आपण जोपासली पाहिजे. अलीकडच्या काळात आपण पाश्चात्य देशातील लोकांचे अनुकरण करत आहोत. त्यामुळे आपणच आपले आरोग्य बिघडवायला कारणीभूत आहोत. आपल्याच देशातील ऋषीमुनी दीडशे – दोनशे वर्ष जगायचे. परंतु आत्ताचा काळा हा ६४ ते ७० वर्षापर्यंतचा काळ राहिला आहे .पाश्चात्य देशातल्या लोकांनी आहारावर अभ्यास केला.विविध देशातील लोकांच्या आहाराबाबत माहिती जाणून घेतली.त्यावेळी त्यांना भारतीय आहार उत्तम वाटला. म्हणून त्यांनी भारतातील आहार सुरू केला आणि आपण पाश्चात्य देशातील आहार स्वीकारला. त्यामुळे आपले आरोग्य बिघडत गेले.आपल्या शरिरावर अनावश्यक चरबी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक आजारांना आपण आमंत्रण देत आहोत.
.प्राणायम,योगासन,व्यायाम व योग्य आहार घेतला तर तुम्हाला कोणताही रोग होणार नाही. तसेच आयुष्यमान दिर्घकाळ राहिल. तसेच महिलांनी मुलांना घडवत असताना आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यावर लादू नका आयुष्यात त्याला जे घडायचे आहे ते मुलांच्या इच्छेप्रमाणे करू द्या. राजश्री पाटील म्हणाल्या, जागतिक महिला दिनानिमित्त फक्त एक दिवसापुरता महिलांचा सन्मान न करता दररोज महिलांना सन्मानाने वागवले पाहिजे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात गरुड झेप घेत आहेत .पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास महिला सक्षम होत आहेत.
तेजस्विनी कदम म्हणाल्या, मातृत्व ,कर्तृत्व आणि नेतृत्व ज्या महिलांच्या अंगी असेल त्या महिला आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही. २१० हाडे मोडल्यानंतर जेवढे यातना होतात तेवढ्या यातना म्हणजे मातृत्व. महिला मुलाचे संगोपन करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यांना कर्तुत्व म्हणतात.समाजाचा पाठिंबा असेल तर कर्तुत्व व नेतृत्वाच्या जोरावर आपण जगाच्या पाठीवर कुठेही सक्षमपणे काम करू. माझ्या जीवनामध्ये डॉ. मीनाक्षी कदम,डाॅ.सुभाष कदम व ॲड सुजित कदम यांचे खूप मोठे स्थान आहे. या सर्वांनी माझ्या जीवनाला आकार दिला. वेळोवेळी या सर्वांचे मार्गदर्शन मला मिळत गेले व मला समाजामध्ये जगण्याचे सामर्थ्य दिले. महिला या अष्ठावधानी असतात. एकाच वेळी अनेक कामे करत असतात. म्हणून प्रत्येक पुरुषांनी महिलांना सन्मानाने वागवले पाहिजे. स्त्रिया सुरक्षित राहिल्या पाहिजेत.
यावेळी अॅड प्रकाश घुले, प्राचार्य रवींद्र काशिद उपमुख्याध्यापक सुनील नागणे पर्यवेक्षक राजू काझी दिलीप चंदनशिवे सुहास माने,इंग्लिश स्कूल भोसेचे प्राचार्य जयराम अलदर,
इंग्लिश स्कूल नरखेडचे मुख्याध्यापक अजित शिंदे, इंग्लिश स्कूल आंबेचिंचोलीचे मुख्याध्यापक सुभाष बाबर, इंग्लिश स्कूल वेळापूरचे उपमुख्याध्यापक सुनील खंदारे, पर्यवेक्षक पठाण शिवशरण ,योगशिक्षक संतोष दुधाळ ,शिवशंभो महिला पतसंस्थेच्या व्हाईसचेअरमन अश्विनी अलदर, संचालिका वैशाली सावंत,सविता नागणे, भारती धसाडे,स्मिता शिंदे, ज्योती नेहरवे,गोरीमा शेख, वसुधा माळी,मधुमती घुले ,अंकिता सावंजी,रत्नमाला मुंढे,सारिका कौलगे, आदींसह सेवानिवृत्त शिक्षिका महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाच्या सर्व शाखांतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या,
तसेच यावेळी इंग्लिश स्कूल प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ढोल चे प्रात्यक्षिक सादर केले.यावेळी महिला दिनानिमित्त विविध संदेश देण्यात आले .यामध्ये सहशिक्षिका आलिया काद्री,शुभम खंदारे, जैद काझी, आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सविता नागणे,सुत्रसंचालकन स्वाती दिवसे, रेश्मा गुंगे तर आभार उज्वला पाटील यांनी मानले.