मिरज(प्रतिनिधी)मनुष्यजीवन हे रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्युमुखी पडण्यासाठी नसुन भौतिक कर्तव्ये पार पाडुन सदगुरूचा शोध घेऊन आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असे आवाहन आयुक्त सुनिल पवार यांनी केले.
सतगुरू चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली यांच्या वतीने मिरज येथील बालगंर्धव नाट्यगृह, व मिरज येथे 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आणि रस्ता सुरक्षा प्रबोधन हा समारंभ घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी हे होते. प्रमुख पाहुणे सुनिल पवार,आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि प्रमुख उपस्थिती डॉ. डी टी पवार, से. नि. प्रादेशिक परिवहन अधिकारी, सौ. संगीता खोत माजी महापौर, विजय धुळूबुळू माजी महापौर सौ. जईदा इनामदार माजी उपमहापौर, डॉ हर्षवर्धन पोखरकर वरिष्ठ आँकोलॉजिस्ट, प्रशांत साळी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गजेंद्र कल्लोळी ह्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक नागरगोजे राजेंद्र, माने ए डी,राजीव कुलकर्णी इ.ची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर मा. महापौर मा. आयुक्त, मा. माजी महापौर आणि संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करताना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि “Safe Travel” हे रस्ता सुरक्षा नियमांचे पुस्तक देण्यात आले.आभार मनोहर कुरणे यांनी मानले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.