आवताडे शुगर येथे कामगार व ऊसतोड मजुरांच्या आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

मंगळवेढा (प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, मरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर कामगार व ऊसतोड मजुरांचे आरोग्य तपासणी शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये कारखाना कर्मचारी ऊसतोड कामगाराचे एकूण एकुणात्मक ३५२ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या कामगार व मजुरांची मंगळवेढा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मंगळवेढा येथील डॉ विलास तोंडे पाटील व डॉ अरुण कुमार यांचे मार्फत इ.सी.जी, रक्तदाब, मधुमेह आधी आरोग्य विषयक समस्यांची तपासणी करून उपचारपर मार्गदर्शन करण्यात आले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजय आवताडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये कारखाना कामगार व ऊसतोड मजूर यांची शारीरिक आरोग्य तपासणी करून नामवंत डॉक्टरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवर व शिबिरासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर मंडळी आणि कर्मचारी या सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभा राहून नंदेश्वर येथे घडलेल्या अमानुष तिहेरी हत्याकांडातील माऊलींच्या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी मिस्टर संचालक प्रमोदकुमार म्हमाणे यांनी सांगितले की, ऊसतोड व साखर कारखानदारीमध्ये शारीरिक परिश्रम यांच्याशी सलगी करून रात्रं- दिवस अविरतपणे कष्ट करणाऱ्या कामगारांच्या व ऊसतोड मजुरांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कारखाना प्रशासन नेहमी सजग असते. केवळ व्यावसायिक व व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता कारखाना सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या कामगार व मजुरांच्याप्रती संवेदनशील दृष्टिकोन ठेवून कारखाना प्रशासनाने आयोजित केलेल्या या शिबिराचे सर्वच मंडळींनी कौतुक केले.

या शिबिरासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, श्री संत दामाजी शुगर माजी मिस्टर संचालक भारत निकम डॉ. भिमराव पडवळे, एच आर मॅनेजर डी. बळवंतराव, वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चिफ केमिस्ट मोहन पवार, डिस्टलरीज मॅनेजर संभाजी फाळके, फायनान्स मॅनेंजर रघुनाथ उन्हाळे, शेती अधिकारी रमेश पवार व संपत आटकळे, वसंत लेंडवे, आय टी मॅनेंजर मिनाज शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, सुरक्षाअधिकारी चंद्रकांत राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गौरीशंकर बुगडे, सिद्धराया बिराजदार, आनंद हत्तरसंघ, आरोग्य सहाय्यक नागनाथ लंगोटे, औषध निर्माण अधिकारी हनुमंत कलादगी, प्रवीण पवार, चंद्रकांत पवार शहजान मुलाणी, विद्याराणी स्वामी, मोहन सरडे, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका आदी मान्यवर व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.