“गुलाल आम्हीच उधळणार;४ जूनचा रंग भगवाच असेल”

भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विश्वास : पाणीवेस तालीमच्या रंगोत्सवात सहभाग

सोलापूर (प्रतिनिधी) कोणीही काहीही टीका केली तरी सोलापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्याच पाठीशी उभे आहेत. रंगपंचमीचे रंग अनेक असले तरी ४ जून रोजी निवडणूक निकालाच्या दिवशीचा रंग भगवाच असेल. या निवडणुकीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार, असा विश्वास भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी व्यक्त केला.

रंगपंचमीनिमित्त आमदार राम सातपुते यांनी पाणीवेस तालीमच्या रंगोत्सवात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी केली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी पाणीवेस तालीमच्या गणरायाची आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला.

आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोठ्या प्रमाणावर रोजगार, पुरेसे पाणी, एमआयडीसीचे विस्तारीकरण, आयटी पार्क, गारमेंट पार्क होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सोलापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विरोधी पक्षाच्या उमेदवार माझ्यावर टीका करत आहेत. त्यांच्या पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. मी तर सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे. त्यांनी कितीही पातळी सोडून टीका केली तरी आम्ही विकासाचीच चर्चा करणार. इतकी वर्षे सत्ता उपभोगून देखील आजवर सोलापूरचा विकास का नाही झाला ? याचे उत्तर काँग्रेसने जनतेला द्यावे असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले.

 

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, सुभाष पवार, महादेव पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.