नंदेश्वर येथे चिमुकल्यांच्या आठवडी बाजाराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद!

नंदेश्वर जिल्हा परिषद केंद्र शाळाने राबविला अनोखा प्रयोग!

मंगळवेढा(प्रतिनिधी) जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर येथे सहशालेय उपक्रम व दशसूत्री कार्यक्रम अंतर्गत मुलांचे व्यवहारज्ञान वाढविण्यासाठी आठवडी बाजार या उपक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 9 रोजी सकाळी 11.00 वाजता केले होते. पंचायत समितीचे गट‌शिक्षणाधिकारी बजरंग पांढरे, विस्तार अधिकारी पोपट लवटे, केंद्रप्रमुख धनाजी नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर येथे आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी आपल्या शेतात असलेला भाजीपाला, केळी, कणसे तसेच इतर साहित्य विक्रीस आणले होते. त्याचबरोबर यामध्ये गोळ्या बिस्किट स्टॉल, वडापाव, समोसा स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी आठवडी बाजाराचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्याचा आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमास विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी पोलिस पाटील, ग्रा.पं. सदस्य, शा.व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत नंदेश्वर, शा. व्य. समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

वडापाव स्टॉल ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
नंदेश्वर गावच्या ग्रामस्थांना चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरणे हे मोठे आकर्षण ठरले. त्यातही या आठवडी बाजारात श्रीकांत सासणे आणि शौर्य सासणे यांनी लावलेला वडापाव आणि समोसा स्टॉल या आठवडा बाजारातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गावातील अनेक लहान मुले, युवक यांचेसह महिलावर्ग आणि वृद्धांनीही सासणे बंधूंच्या वडापाव स्टॉलवर वडापाव खरेदी केला.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.