पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

दामाजी कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचे मोठे योगदान-शिवानंद पाटील

मंगळवेढा(प्रतिनिधि) दामाजी कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान मोठे असून त्यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत संचालक मंडळ सकारात्मक असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.

      दामाजी कारखान्याला नुकताच एन एफ डी सी कडून 94 कोटीचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले. त्यामध्ये अध्यक्ष शिवानंद पाटील व संचालक मंडळाचे मोठे योगदान ठरल्यामुळे कामगारांच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष शिवानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व संचालक कामगार आदी उपस्थित होते अध्यक्ष पाटील म्हणाले की कारखान्यावर कारखान्यावर कारखान्याचा कारभार आमच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून सभासदांनी सोपवला त्यावेळी अवघे तीन लाख रुपये खात्यावर शिल्लक होते माजी आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक भगीरथ भालके या यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, राहुल शहा, रामकृष्ण नागणे,दामोदर देशमुख यांनी पाठीवर हात ठेवल्यामुळे कारखान्याचे दोन गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडले. ऊस उत्पादक व वाहतूक ठेकेदाराचे बिले देखील वेळेत अदा करू शकलो. तालुक्यातील ऊस उत्पादकांचा विश्वास कारखान्यावर वाढल्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला त्यासाठी अर्थसाहयाची गरज होती. अर्थसहाय्य उपलब्ध करण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव दिला होता मात्र मा.आ. प्रशांत परिचारक यांनी पाठवलेल्या एका टेक्स्ट मेसेजवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 94 कोटीचे अर्थसहाय उपलब्ध केले. त्यामुळे यापुढील काळात कारखान्याचे गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने पार पाडून ऊस उत्पादकाची देयके वेळेत आदर करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील. त्याचबरोबर कामगारांचा पगार व त्यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत संचालक मंडळ सतर्क राहील. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे पाच लाखाचे गाळप करण्याचा विश्वास कामगार व ऊस उत्पादकाच्या जोरावर व्यक्त केला  यावेळी संचालक राजेंद्र पाटील कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांची भाषणे झाली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close