मंगळवेढा(प्रतिनिधी)‘रक्तदान हेच जीवनदान,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने उद्या मंगळवार दि 21 नोव्हेंबर रोजी स्थळ आ.समाधान दादा आवताडे जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय आवताडे यांनी दिले आहे. नाते तेच साथ देणारे,जीवन तेच आनंद देणारे,दान तेच जीवन देणारे या उक्ती प्रमाणे आपले आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वाढदिवसा दिवशी आपण या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदानरुपी शुभेच्छा द्याव्यात तेच माझ्यासाठी आपले आशीर्वाद व शुभेच्छा असतील.आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे अनमोल जीवन वाचवू शकते.यामुळे मानवसेवा या भावनेतून आपण सर्वांनी मिळून माझ्या जन्मदिनानिमित्त रक्तदानाचा हा संकल्प सिध्दीस न्यावा असे आवाहन आ.समाधान आवताडे यांनी केले.
Check Also
Close