मंगळवेढा(प्रतिनिधी) अडचणीतली संस्था चांगली चालावी म्हणून तालुक्यातील सभासदांनी दामाजी कारखाना आमच्या ताब्यात दिला असला तरी देखील दामाजीला भविष्यात चांगले दिवस आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन चेअरमन शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या 31 व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष तानाजी खरात हे होते.याप्रसंगी मुरलीधर दत्तू,राजेंद्र पाटील, बसवराज पाटील, तानाजी कांबळे, तानाजी काकडे,गौडाप्पा बिराजदार,दिगंबर भाकरे,महादेव लुगडे,काशीनाथ पाटील, बंडु करे,दादा दौलतडे,माधवानंद आकळे,संतोष सोनगे,खुदा शेख,आदीसह कारखान्याच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी संचालक दयानंद सोनगे व त्यांच्या पत्नी कविता सोनगे यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले की,कारखान्यावर 198 कोटीची कर्ज असताना देखील सभासदांनी दिलेल्या विश्वासाला पात्र राहून गतवर्षीच्या गाळप हंगाम यशस्वी केला. ऊस उत्पादक,वाहतूक ठेकेदार, व वाहन मालकांची देणी वेळेत देण्याची भूमिका घेतली. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे दोन लाखाचे गाळात होईल का नाही याची शाश्वती नव्हती तरी देखील चालू हंगाम दामाजी कारखान्याने सभासद, कामगार,ऊस उत्पादकाच्या जोरावर यशस्वी केला तालुक्यातील सभासदांचा विश्वास हा दामाजीवर असल्यामुळे तो चांगला चालला पाहिजे या पद्धतीने भूमिका घेतली,शिखर बँक,जिल्हा बँक, पतसंस्थाची देणे थकल्यामुळे त्या कारवाईची भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. यंदा तालुक्यामध्ये पाच हजार हेक्टर इतके ऊस क्षेत्र असून सध्या इतर कोणते प्रकल्प नाहीत. साखरेचे व मोलॅशिसचे दर घसरले आहेत तरी देखील दामाजीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दिला
प्रास्ताविक दिगंबर भाकरे यांनी तर सूत्रसंचालन अशोक उन्हाळे तर आभार शेती अधिकारी कृष्णा ठवरे यांनी मानले
—–
सर्वाधिक टॅक्टर व्दारे
ऊस तोडणी व पुरवठा :-बंडू करे नंदेश्वर (प्रथम),सुनिल जाधव जुनोनी (व्दितीय), संजय जाधव मुढवी (तृतीय),बैलगाडीव्दारे सर्वाधिक ऊस तोडणी व पुरवठा :- सखाराम पठाडे,नाळवंडी (प्रथम),आदीनाथ पन्हाळकर,नाळवंडी (व्दितीय), गोरख पठाडे,नाळवंडी (तृतीय), डंपीग टॅक्टर व्दारे ऊसतोडणी व पुरवठा :- वसंत दौलतडे नंदेश्वर (प्रथम),सुभाष होनमाने तामदर्डी (व्दितीय),विकास चव्हाण,(तृतीय),मशीनव्दारे उस तोडणी व पुरवठा :- बसवराज पाटील,महादेव लुडगे यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.