मंगळवेढा(प्रतिनिधी)सध्याच्या परिस्थितीमध्ये सोलापूर लोकसभेत गेल्या दोन टर्ममध्ये आपण ज्या भारतीय जनता पक्षांच्या दोन खासदारांना सलग दहा वर्षे संधी दिली परंतु त्यांच्याकडून कोणतेही विकास काम मतदारसंघांमध्ये मार्गी न लागल्याने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे आशीर्वादाच्या रूपाने उभे राहून गेल्या दोन टर्म मधील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार म्हणून मला संधी द्या मी आपण दिलेल्या संधीचे नक्की सोने करेन अशी भावनिक साद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी प्रणित सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी घातली आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार शिंदे मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान त्या सलगर खुर्द येथे बोलत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून रखडत असलेला मंगळवेढा उपसा सिंचन पाणी प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण वेळोवेळी विधिमंडळात या विषयावर आवाज उठवला होता. तत्पूर्वी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व या मतदार संघाचे माजी दिवंगत आमदार स्व.भारत भालके या मंडळींनी ही अतिशय मोठा संघर्ष करून या योजनेचा मंजूर होण्याचा मार्ग सुकर केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणितीताई शिंदे या सलगर खुर्द येथे आल्या असत्या त्यांनी गावातील पाणी टंचाई , म्हैशाळ पाणी, चारा डेपो तसेच, रस्त्याचे आणि बंधारा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली , त्यांचा सत्कार मंगळवेढे भूमी संतांची पुस्तक देवून सलगर खुर्द च्या उपसरपंच सौ. संध्या विलास काटकर, मंगल अरविंद वनखंडे, सुमन मस्के, शिंदुबाई बिराजदार यांनी केला.
पुढे बोलताना ताई म्हणाल्या की, देश स्वतंत्र झाल्यापासून राष्ट्रीय काँग्रेसने कष्टकरी, शेतकरी, असंघटित कामगार वर्ग आदी सामान्य वर्गांना केंद्रस्थानी ठेवून अतुलनीय कार्य केले आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून जातीपातीचे राजकारण करणाऱ्या काही घटकांनी या देशाला मूळ मुद्द्यांपासून दूर नेत केवळ फोडाफोडीचे राजकारण करून देशाची भावना खोलवर रुजवली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील या सर्व बाबींवर विकासाच्या रूपाने रामबाण उपाय करण्यासाठी पक्षाने माझ्यावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रगतीच्या भावपूर्ण करण्यासाठी ही जबाबदारी सोपवली निश्चितच आपल्या सर्वांच्या पाठिंब्या सोलापूर लोकसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर वर्षानुवर्ष रखडलेली ही कामे पूर्ण करणे ही मी माझी जबाबदारी समजते.आपल्या सर्वांचा विश्वासाला तडा जाईल अशा प्रकारचे कुठलीही काम माझ्याकडून होणार नाही, हा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छिते असे आवाहन करून आमदार प्रणिती शिंदे यांनी सोबत येण्याची विनंती केली, या गाव भेट दौऱ्यात काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, सरपंच दशरथ उर्फ राजू गाढवे, खुपसंगीचे माजी सरपंच शहाजान मुलांनी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, पांडुरंग जावळे, अशोक चेळकर, नाथा ऐवळे, मनोज माळी, प्रमुख उपस्थित ग्रामस्थ- सिद्धेश्वर भुसनर, रमेश ओलेकर,संभाजी भुसनर,पाटलू भुसनर, धोडिंबा लेंगरे, धनंजय पाटील, संतोष पाटील , बाळासाहेब काटकर, सागर व्हनवटे, युवराज वनखंडे, तुकाराम पाटील,
यांच्यासह ग्रामस्थ व मतदार बंधू-भगिनींना मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय आदाटे यांनी केले व आभार अजय काटकर यांनी मानले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.