‘घंटोका काम, मिनटो में’ म्हणत लग्नसराईत ई-पत्रिकेलाच अधिक पसंती!
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे .काळानुरूप राहणीमान व परंपरा आता मागे पडू लागली आहे. लग्न सोहळ्यात प्रत्येक नातेवाईकांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देण्याची मोठी जबाबदारी आता सोशल मीडियामुळे कमी झाली आहे. लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका आता सोशल मीडियावर पाठविण्याचा ट्रेंड प्रचलित झाला असून शेकडो लग्नपत्रिका छापून त्या पाहुण्यापर्यंत पोहोचविण्यासाठीचा अट्टाहास कमी झाला आहे. यामुळे खर्च आणि वेळ याची देखील बचत होत आहे. त्यामुळे या लग्नसराईत ई-पत्रिकेला अधिक पसंती दिली जात आहे.
धुमधडाक्यात होणाऱ्या लग्न समारंभाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापणे आणि वाटणे हा होय, आणि यासाठीच कार्यक्रम प्रमुखांना चांगलीच धावपळ करावी लागते. काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिका घेऊन मुला-मुलींचे आईवडिल नातेवाईकांना आणि आपल्या स्नेहीजनांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी त्यांच्या घरी जात होते आणि आस्थेने व आपुलकीने निमंत्रण पत्रिका देऊन लग्नाला यायचं बरं का? असं सांगत होते. आजही ही प्रचलित पद्धत असली तरी सोशल मीडियामुळे हा त्रास आता कमी झालेला आहे. धकाधकीच्या काळात कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नाही. मग ती नाती असोत अथवा मैत्री. पाहुण्यामध्ये आठ दिवस चालणारे लग्न समारंभ आता पाच ते सहा तासांवर आलेले आहेत. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर चांगलाच वाढलेला आहे. दिवसेंदिवस या सवयी वाढतसुद्धा आहेत. लग्नासह बारशाचे आणि तेरवीचे निमंत्रणसुद्धा आता मिळताना दिसत आहे.
व्हॉट्सअॕपवर पाठविण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. नागरिक आता सोशल मीडियाचा वापर करून सर्वप्रकारचे निमंत्रणे आणि संदेश देण्याचे काम अगदी मिनिटातच करू लागला आहे.भरपूर लग्नपत्रिका छापून त्या पाहुण्यांना पाठविण्यासाठीचा अट्टाहास आता कमी होऊ लागला आहे. निमंत्रणासाठी आता व्हॉट्सअॕपसारख्या माध्यमांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे वेळेची आणि पैशाची बचत मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘घंटोका काम, मिनटो में’ होऊ लागले आहे. त्यामुळे आता ई- निमंत्रणाला या लग्नसराईत अधिक महत्त्व