मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी आपल्या संपर्क कार्यालय येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात माध्यमातून चालू घडामोडीवर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात भारतच्या कार्यशैली वर बोलताना म्हणाले की भारत येत्या १ डिसेंबर रोजी जी-२० सामर्थ्यशाली गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. अध्यक्षपद मिळणे खूप मोठी संधी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगाचे हित साधण्यासाठी तसेच शांतता, ऐक्य, पर्यावरण, शाश्वत विकास यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर योग्य तोडगा काढण्यासाठी जी-२०च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले की सामर्थ्यशाली जी-२० गटाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत सूत्रानुसार काम करणार आहे. गटाच्या देशांमध्ये जगातील लोकसंख्या आहे.अमृतमहोत्सवी काळात भारताला जी. २०चे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. असेही मोदी म्हणाले.
तेलंगणातील लोकांचे केले विशेष कौतुक!
नागा संस्कृती टिकून राहावी म्हणून नागा लिडी- क्रो-यू संस्था स्थापन केली आहे. उत्तर प्रदेशमधील गावामध्ये जतीन ललित सिंह यांनी दोन कम्युनिटी लायब्ररी व रिसोर्स सेंटर सुरू केले आहे. झारखंडमधील काही जिल्ह्यात काम करण्यासाठी संजय कश्यप यांनी ग्रंथालयाची स्थापना केली. सर्व व्यक्ती. संस्था यांच्या प्रयत्नांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात खास उल्लेख केला यावेळी मन की कार्यक्रम पाहण्यासाठी मन की बात चे जिल्हा समन्वयक संतोष,भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष औदुबर वाडदेकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शहरध्यक्ष गोपाळ भगरे, किसान सेलचे विजय बुरकुल,अशोक माळी,बबलु सुतार,सागर ननवरे,सुरज जाधव,साईनाथ शिंदे यांच्या अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते