लागा कामाला! येणार प्रत्येक दिवस जनतेसाठी,परिचारकांनी आपले राजकीय पत्ते खोलण्यास केली सुरुवात!

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर विधानसभा निवडणुकीला जेमतेम नऊ महिन्याचा अवधी शिल्लक असताना मा.आ. प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देत जनतेच्या दरबारात उतरले त्यामुळे प्रशांत परिचारकांचा इशारा भाजप नेत्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वेगवेगळ्या पक्षातून आमदारकी आमदार या मतदारसंघात झाले मात्र स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी दिलेल्या पाठिंबामुळे आमदार समाधान आवताडे यांना भाजपामधून आमदार होण्याची संधी मिळाली आमदार समाधान आवताडे यांनी सत्तेचा लाभ घेत तालुक्यातील विविध प्रश्नासाठी कोट्यावधीचा  निधी उपलब्ध केला मात्र आता विधानसभा निवडणुकीला जेमतेम नऊ महिन्याचा आदेश शिल्लक असताना प्रशांत परिचारक यांनी चक्क विधानसभा विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिल्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.नव्या वर्षातील पांडुरंग परिवाराच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. आ. प्रशांत परिचारक यांच्या मंगळवेढा येथील संपर्क करण्यात आले. यावेळी दामाजी कारखानेचे अध्यक्ष शिवानंद पाटील,रामकृष्ण नागणे,युन्नुश शेख,औदुबर वाडदेकर,अजित जगताप,प्रविण खवतोडे,गौरीशंकर बुरुकुल,गौडाप्पा बिराजदार,भारत बेदरे,विजय बुरुकुल, तानाजी कांबळे गोपाळ भगरे,दिगंबर भाकरे, कन्हैया हजारे,अशोक माळी,शिवाजी नागणे,हौसाप्पा शेवडे,सचिन चौगुले,आदी सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिनदर्शिका प्रकाशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी या तालुक्यातील प्रश्न अजूनही रखडले आहेत. मालक तुम्ही या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर सोमवारी वेळ द्या अशी मागणी केली असता त्यावर सोमवारच काय कायमस्वरूपी या मतदारसंघातील प्रश्नासाठी कायमच उपलब्ध राहणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक हे देखील विधानसभेचे दावेदार असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत चालले आहे त्यामुळे आगामी काळातील राजकीय हालचाली परिचारक यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये परिचारकांचा विस्तार कमी होता परंतु दामाजी कारखान्याच्या नेतृत्व शिवानंद पाटील यांची सत्ता आल्यामुळे तालुक्यात गट विस्तार करण्यास संधी मिळाली.                                                        त्यामुळे 2014 व 2019 ला झालेल्या निसटत्या पराभवातील मताधिक्य हे मंगळवेढ्यातून दामाजी कारखान्याच्या सत्तेमुळे भरून निघू शकते अशा राजकीय अंदाज असल्यामुळे परिचारकांनी आपले राजकीय पत्ते खोल खोलण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळू लागले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.