मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा शहरात आठ कोटी रूपयांचे भव्य असे नाटय संकुल उभारण्यात येणार असून याचे भूमिपूजनही होत आहे. याकरिता आणखी निधी लागला तरी आपण देणार असल्याची ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
शंभराव्या नाटय संमेलनानिमित्त अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढाच्या वतीने इंग्लिश स्कूलच्या मैदानावर प्रशांत दामले व वर्षा उसगावकर अभिनेत सारखं काही तरी होतय या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
सुरूवातीस स्व.दलितमित्र कदम गुरूजी यांच्या प्रतिमेचे सोलापूरच्या धर्मादाय उपायुक्त सुनिता कंकणवाडी यांचे हस्ते करण्यात येवून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आ.समाधान आवताडे यांनी डॉ.श्रीराम लागू रंगमंचाचे पूजन केले.
यावेळी आ.आवताडे म्हणाले, मंगळवेढयाच्या मातीतून अनेक कलाकार तयार झाले असून महाराष्ट्रभर त्यांचा नावलौकीक आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून मंगळवेढयात प्रशस्त असे नाटयसंकुल लवकरच उभारण्यात येणार आहे. यामुळे कलाकारांची व रसिकांचीही चांगली सोय होणार आहे. मंगळवेढयात शंभराव्या नाटय संमेलनाचे काही प्रयोग होत आहेत. ही सर्वांच्याच अभिमानाची गोष्ट असून या संमेलनामुळे नाटय चळवळ वाढीला नक्कीच चालना मिळेल.
कार्यक्रमास संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, अ.भा.नाटय परिषद शाखा मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ.सुभाष कदम, शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा.डॉ.मिनाक्षी कदम, अध्यक्ष अॅड.सुजित कदम, सचिव प्रियदर्शनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, नाटय परिषद नियामक मंडळाच्या सदस्या प्रा.तेजस्विनी कदम, माजी सदस्य यतिराज वाकळे, उद्योजक पवन महाडिक, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, समृद्धी ग्रुपचे संजय सावंत, सोलापूर महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अंबादास कमटम, छत्रपती परिवाराचे सुरेश पवार, जेष्ठ समाजसेवक डॉ.शिवाजीराव पवार, शरद साखरे, शिवार नाटय संमेलनाचे कार्याध्यक्ष दिगंबर भगरे, नाटय परिषदेचे कार्यवाह अशपाक काझी, उपाध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, सदस्य सुहास माने, युवराज जगताप, गणेश यादव, राजेंद्रकुमार जाधव, सतिश सावंत, अजित शिंदे, प्रा.राजेंद्र गायकवाड, अशोक जाधव, सचिन ढगे, प्रा.उज्वला पाटील यांचेसह मनिषा महाडिक,सुवर्णा महाडिक,मोना महाडिक व इतर मान्यवर तसेच नाटयप्रेमी उपस्थित होते.
प्रास्तविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालाजी शिंदे यांनी केले.
सारखं काही तरी होतय ने उडविले हास्याचे फव्वारे…
मंगळवेढयात सादर करण्यात आलेल्या सारखं काही तरी होतय… या नाटकास मोठी गर्दी दिसून आली. यामधील कलाकार प्रशांत दामले, वर्षा उसगावकर,पोर्णिमा अहिरे, सिद्धी घैसास व राजेश देशमुख यांनी आपल्या अभिनयाने व विनोदीने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. सुरूवातीपासून शेवटपर्यंत हास्याचे फवारे उडत होते. नाटकादरम्यान प्रशांत दामले यांनी गायिलेली गाणी तसेच वर्षा उसगावकर यांची एंट्री सर्वांनाच भावली. नाटकाच्या माध्यमातून स्वतःच्या इच्छेपेक्षा आपल्या मुलांची स्वप्ने मोठी असतात. त्यांना ती पूर्ण करण्यासाठी आटकाव न करता पाठबळ दिले पाहिजे असा संदेश देण्यात आला असून या नाटकाच्या शेवटी सर्वच कलाकारांनी भावुक संवाद करत प्रेक्षकांच्या डोळयात पाणी आणले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.