सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सेवाभावी कृती पॅनलचे सर्व उमेदवार 900 मतांच्या फरकाने विजयी झाले असून, पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व दत्तात्रय सावंत यांनी सिध्द केले आहे. गतपंचवार्षिक निवडणुकांमध्येही आमदार सावंत यांचे सर्व उमेदवार 700 मतांच्या फरकाने विजयी झाले होते, यावेळी महिला प्रवर्गातील पाटील विद्या व पांगल सुप्रिया या दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या होत्या. इतर मागास प्रवर्गातील सेवाभावी पॅनलच्या राजेंद्र माळी यांना 1713 तर विरोधी उमेदवार अडसूळ बाळासाहेब 731 मते मिळाली , विमुक्त ज. भटक्या ज. प्रवर्गातील सेवाभावीचे नामदेव हलदर यांना 1632 तर विरोधी उमेदवार दादासाहेब वाघमोडे यांना 753 मते मिळाली अनसूचित जा. प्रवर्ग मधील सेवाभावीचे शिवाजी शिंदे यांना 1633 तर धनाजीसर्व साधारण प्रवर्गातील सेवाभावी पॅनलचे दत्तात्रय कदम (1667), तात्यासाहेब काटकर (1632), मारुती गायकवाड (1596), सुरेश गुंड (1609), समाधान घाडगे (1601), संभाजी चव्हाण (1633), शिवाजी थिटे (1531), कैलास देशमुख (1610), सुभाष भीमनवरू (1569), नवनाथ मोहोळकर (1578), जवानसिंग रजपूत (1492) मते मिळवून विजयी झाले.
शिक्षकांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने 1977 मध्ये स्थापन झालेली शिक्षक पतसंस्था सुरुवातीला अतिशय उत्तम चालू होती परंतु मध्यंतरी काही गुंडगिरी वृत्तीच्या व्यक्तीमुळे पतसंस्थेच्या सचिवांच्या खूनापर्यंत मजल गेल्याने, तसेच भ्रष्टाचार या कारणाने चर्चेत आली होती.
परंतु 2015 मध्ये दत्तात्रय सावंत हे पुणे विभागीय शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या संस्थेच्या सभासदांनी दत्तात्रय सावंत हे सभासद नसताना सुद्धा आग्रहाने पॅनल उभा करण्यासाठी विनंती केली. त्याप्रमाणे आमदार सावंत यांनी पॅनल उभा करून विजय मिळवून सत्ता स्थापन केली, त्यांनी कर्जात अडकलेल्या पतसंस्थेस स्वभांडवलावर आणले, तसेच व्याजदर 14 टक्केवरून 8 टक्क्यांवर आणले . बनसोडे यांना 810 मते मिळाली. संजीवनी निधी योजनेमुळे मयत सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तीला 12लाख रुपयांचे साहाय्य मिळू लागले व जमीनदारांना ही दिलासा मिळाला, त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा दत्तात्रय सावंत यांच्यावर विश्वास व्यक्त केला. नवीन संचालक मंडळ अधिक पारदर्शक कारभार करून राज्यात आदर्श निर्माण करतील, असा विश्वास सावंत यांनी विजयानंतर व्यक्त केला.