मंगळवेढा(प्रतिनिधी)येथील ग्रामीण रुग्णालयातील वाढीव 100 खटाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत ते प्रश्न तातडीने मार्गी लागावेत मागणीचे निवेदन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आयुक्त आरोग्य विभाग मुंबई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. ग्रामीण रुग्णालयाचा वाढीव खाटा उपलब्ध कराव्यात अशी मागणी यापूर्वी तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. समाधान आवताडे यांनी केली होती. त्यानंतर विधानसभेत प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यानंतर वाढीव खाटाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही, शिक्षण व आरोग्याच्या अभ्यासासाठी दिल्ली दौरा केलेल्या सजग नागरिक संघाच्या बैठकीत शेडसाठी यापूर्वी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या डॉ शरद शिर्के यांनी दोन लाखाची मदत जाहीर मंगळवेढेकरांच्या आरोग्याच्या प्रश्नावर पुढाकार घेण्यास सुरुवात केली मात्र शासनाकडून रखडलेल्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याचे समोर येऊ लागले.
या प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी देखील पुन्हा पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले होते मंगळवेढ्याच्या संपर्कात असलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदा बरोबर नवीन शेड बाबत लक्ष घालण्याबाबत भाजप नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज मुंबई येथे आरोग्य विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत मागणीचे निवेदन दिले. याशिवाय टेंभुर्णी -विजयपूर व नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गामुळे वाहनांची संख्या वाढली आहे आंधळगाव व मरवडे येथे 108 ही रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली दरम्यान आरोग्य विभागाचे सचिव खंदारे हे लक्ष्मण ढोबळे हे पालकमंत्री असताना ते पंढरपूरला आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते या महामार्गावर रुग्णवाहिका का उपलब्ध नाही याची चौकशी करून त्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी ढोबळे यांच्याशी बोलताना दिले
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.