आवताडे शुगर्सचा पहिला हप्ता 2350 जाहीर;सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक दर!

24 दिवसात एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळपाचा विक्रम!

 

मंगळवेढा(प्रतिनिधी) सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मंगळवेढा तालुक्यातील नंदुरच्या अवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने २३५० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून खासगी कारखानदारीत जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याचा विक्रम केला आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी फॅबटेक शुगरचे आवताडे शुगर मध्ये रूपांतर झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतीनिशी यंत्रणा लावत कामगार भरती करून दोन महिन्यात साखर कारखाना सुरू करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चार नोव्हेंबर रोजी मोळीपूजन केले,त्यानंतर 24 दिवसात एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत कारखाना व्यवस्थित सुरू केला असून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर हा कारखाना देईल असा दिलेला शब्द पाळत सर्व जातीच्या उसाला समान 2350 रुपयाची उचल जाहीर केली असून सोमवारपासून शेतकऱ्यांना बँकेतून पैसे मिळणार असल्याची माहिती चेअरमन संजय आवताडे यांनी दिली.
यावेळी आवताडे म्हणाले कि आवताडे शुगर सर्वाधिक दर देणार असा विश्वास आमच्या परस्पर शेतकऱ्यांना सुद्धा होता आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना उभारला असून आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व कामगार कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मादास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, वाहन मालक, वाहन चालक, कारखान्याचे शेतकी अधिकारी ऊसतोड कामगार झटत असून या सर्वांचे मोलाचे योगदान असून उसाची रिकव्हरी अजून चांगली वाढली तर अजून चांगला दर देण्यात येईल असे यावेळी चेअरमन संजय आवताडे यांनी बोलून दाखविले.
————————-
आवताडे शुगर ने उसाच्या जातीत एकदुसरेपणा न करता सर्व जातीला एकसमान दर दिल्याने आम्ही या दरावर समाधानी आहे.
अनिल बिराजदार अध्यक्ष स्वा.शेतकरी संघटना
—————————
आवताडे शुगर ने बिनचूक वजन ठेवले असून बंद पडलेला कारखाना घेऊन सुरू करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोळीपूजनाला आणून त्यांच्या साक्षीने हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे हे सिद्ध करेन असा शब्द दिला होता ती शब्द त्यांनी पाळत सर्वाधिक दर दिला आहे .
बापुराया चौगुले सावकार शेतकरी
————————

या शाखेतून मिळणार शेतकऱ्यांना बिल

बबनराव आवताडे पतसंस्था
शाखा मंगळवेढा –
मंगळवेढा, कचरेवाडी, घरनिकी, धर्मगाव, खडकी, मल्लेवाडी, घाटोळे वस्ती, खोमनाळ, चिक्कलगी, शिरनांदगी

शाखा मरवडे – मरवडे, येड्राव, निंबोणी, हुलजंती, माळेवाडी, तळसंगी, भाळवणी (मंगळवेढा), डोणज, नंदुर, बनतांडा (बालाजीनगर), कात्राळ,कर्जाळ,कागष्ट.

शाखा माचनूर- माचनूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, अर्धनारी, सोहाळे, कोथाळे, इचगाव, येणकी, मिरी, अरबळी, वटवटे, वडदेगाव, नळी, आंबेचिंचोली.

राजमाता अर्बन बँक –
शाखा मंगळवेढा – बठाण, उचेठाण, ढवळस, गुंजेगाव (मं.), महमदाबाद (शे), लक्ष्मी दहिवडी, मुढवी.

यशोदा महिला पतसंस्था मंगळवेढा
अकोला, शेलेवाडी, गणेशवाडी, शरदनगर (ढेकळेवाडी), नंदेश्वर, मारापुर.

जनकल्याण मल्टीस्टेट पंढरपूर– तावशी, ओझेवाडी, सरकोली, आंबे, रांझणी, भोसे (क), तारापूर.

शाखा बेगमपूर –
बेगमपूर, पुळुज, पुळुजवाडी, औंढी, पाटकुल, टाकळी सिकंदर.

शाखा भंडारकवठे –
भंडारकवठे, तेलगाव, कुसुर, निंंबर्गी.

शाखा धुळखेड
धुळखेड, तद्देवाडी, हवीनाळ, गुंदवान, चणेगाव, टाकळी उमराणी, शिरगुर, शिरनाळ.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

2 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.