पंढरपूरमंगळवेढाराजकियसोलापूर

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन सादर करण्यास सवलत,मुदतही वाढवली!

मुंबई(विशेष प्रतिनिधी) ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता त्यामध्ये अंशत: दुरूस्ती करून उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close