पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रराजकियसोलापूर

स्वतंत्र भटके विमुक्त कल्याण मंत्रालय स्थापन करा – माजी आ.नरेंद्र पवार

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नागपुरात संपन्न!

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नागपुरात गुरुवारी संपन्न झाले. भटके विमुक्तांच्या पारंपरिक उद्योग व्यवसाय, पारंपरिक लोककलेला वाव देण्यासाठी मी लवकरच शासन दरबारी बैठक लावून पाठपुरावा करणार आहे. भटके विमुक्तांचे हे राज्यातील पाहिलेच अधिवेशन आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमुळे भटके विमुक्त समाज मागे राहिला, आता हे सरकार भटके विमुक्तांचे आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी स्वतंत्र भटके विमुक्त कल्याण मंत्रालय स्थापन करण्याची मागणी भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केली.

भटका समाज हा कष्टाळू आहे, अनेक भागात विभागला गेलेल्या या समाजाच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करून संख्या निश्चित करणे, शासनाने 31 ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिवस म्हणून साजरा करावा तसेच अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाच्या सर्व योजना विमुक्त भटक्या समाज समाजाला लागू कराव्यात ही मागणी केली, सोबतच सर्व विद्यापीठात विमुक्त भटक्यांचे अभ्यास केंद्र स्थापन करणे. विमुक्त जमातीच्या कला संस्कृती व भाषा जतन करण्यासाठी संग्रहालय स्थापन करणे. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या विमुक्त भटक्या समाजाला स्वामित्वधन (रॉयल्टी) मध्ये सवलत मिळणे. केंद्राच्या सूचनेनुसार विमुक्त भटक्या समाजासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तक्रार निवारण व सल्लागार समिती तात्काळ स्थापन करणे. विमुक्त भटक्या समाजासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांना लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करणे. शासनाच्या सर्व योजनांमध्ये एससी एसटी नंतर विमुक्त भटके समाजाला प्राधान्य असावे. आश्रम शाळांमध्ये सध्या निवासी विद्यार्थ्यांची संख्या १२० आहे ती १८० करावी व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विशेष योजना तयार करावी ही आग्रहाची मागणी यावेळी राज्यव्यापी अधिवेशनात बोलताना भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केली.

दरम्यान, हे सरकार भटक्या विमुक्तांच्या आणि इतर वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठीच सत्तेवर आले आहे, हे अधिवेशन राज्यातील एक अनोखा प्रयोग आहे, यात केलेल्या मागण्या तातडीने सरकारकडे पाठपुरावा करुन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केले.

दरम्यान यया अधिवेशनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. तसेच प्रदेश महामंत्री संजय केनेकर, माजी खासदार विकास महात्मे, इदाते आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, आमदार गोपीचंद पडळकर, अतुल पाठक, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, माजी आमदार विजयराज शिंदे, भटके विमुक्त आघाडीचे माजी प्रदेश अध्यक्ष योगेश बन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भटके विमुक्त प्रदेश सरचिटणीस अशोक चोरमले यांनी विविध मागण्यांचे प्रस्ताव सादर केले.

तसेच हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रदेश सरचिटणीस गोविंदा गुंजाळकर, राजू साळुंखे, शिवाजी आव्हाड, देविदास राठोड, संतोष आव्हाड, धरमसिंग राठोड, महिला प्रदेश अध्यक्ष डॉ उज्वला हाके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश सचिव युवराज मोहिते, युवक अध्यक्ष अमोल गायकवाड, युवती अध्यक्ष भाग्यश्री ढाकने, विदर्भ संयोजिका रश्मी जाधव, सहसंयोजक डॉ पंकज भिवटे, महिला विभाग संयोजक जयश्री राठोड, नागपूर महिला जिल्हा अध्यक्ष प्रीती कश्यप, ग्रामीण अध्यक्ष सीमा कश्यप, गजानन भोरळ, अनिल राऊत, हिरामण साखरे, शांताराम वंदरे, दीपमाला पाल, मंगेश पुरी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महाराष्ट्रतील भटके विमुक्त आघाडीचे सर्व राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच महिला, युवक व युवती विभागाचे प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close