राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबत सहकार विभागाने आदेश प्रसृत केले आहेत.ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरू आहेत. तसेच अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त मतदारांच्या सहभागासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे सहकार विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे. राज्यातील अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यापासून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र, वर्ग क, ड आणि वर्ग इ तसेच न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था यातून वगळण्यात आल्या आहेत. पुढील आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.राज्य निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७०५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतीचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानेही ७१४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्यामध्ये अ-वर्गातील ३८, ब- वर्गातील ११७०, क-वर्गातील ३१५१ आणि ड-वर्गातील २७८८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.