मंगळवेढ्यातील 27 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर!लोकसभेची रंगीत तालीम; उमेदवाराचे दिवाळ तर मतदाराची होणार दिवाळी!

मंगळवेढा(प्रतिनिधी ) जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना , आरक्षण झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची कार्यक्रम आज राज्य निवडणुक आयोगाचे उपसचिव के.सुर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला.ऐन दिवाळीत तालुक्यातील 27 ग्रामपंचायती व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार असल्यामुळे उमेदवाराचे दिवाळ तर मतदाराची दिवाळी होणार आहे.
आज राज्य निवडणूक आयोगाने 2359 ग्रामपंचायतीची तर 3080 ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.17 जानेवारी 2023 आदेशान्वये राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूकान होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला.या ग्रामपंचायतीची अंतीम प्रभाग रचना 25 एप्रिल रोजी राज्य निवडणुक आयोगाने आलेल्या हरकती विचारात घेऊन अंतीम केली. या कार्यक्रमानुसार राज्यातील सुमारे २२८९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्याचे शासनाने २५ मे, २०२३ च्या पत्रान्वये कळविले. 14 जुलै रोजी या ग्रामपंचायतीची मतदार यादी अंतिम झाली होती आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 6 ऑक्टोबर निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे, 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज दाखल करणे, 23 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. आवश्यकता भासल्यास निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी स.7.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी घेण्यात येणार येणार आहे.        तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, आ. समाधान आवताडे यांचा गट व बी.आर.एस. भगीरथ भालके यांच्या गटाबरोबर परिचारक यांचा गट या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे सरपंच पद हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे निवडणुकीचा सगळा आर्थिक भार हा सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारालाच करावा लागणार असल्यामुळे या उमेदवाराचे दिवाळ तर मतदानाची दिवाळी साजरी होणार आहे
—-
या ग्रामपंचायतीची होणार निवडणूक
आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार, मानेवाडी, शिरसी, जंगलगी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी,भाळवणी, तर बालाजी नगर या एकमेव ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होणार आहे

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.