मंगळवेढा(प्रतिनिधी) मंदीर वही बनायगे म्हणणा-यानी राम मंदीराचे ठिकाण का बदलले.जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून भलत्याच प्रश्नाकडे जनतेचे मन वळवण्याचे प्रयत्न केले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे बैठकीत ते बोलत होते.व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे,मा.आ.सिध्दाराम म्हेत्रे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा,शेखर माने,चेतन नरोटे,सुरेश हसापुरे,अनिकेत देशमुख,लक्ष्मण हाके,गणेश पाटील,चंद्रशेखर कौडूभैरी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,मुजमिल काझी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,शिवसेनेचे तुकाराम भोजने,शहरध्यक्ष दत्तात्रय भोसले,माणिक गुंगे,मनोज माळी,आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.पवार म्हणाले की,ज्या राज्यातील सरकार आपल्या हो ला हो म्हणत नाहीत त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत.भारतीय घटनेने जनतेला सर्वाधिकार दिले असताना सध्या सत्ताधाऱ्याने आम्ही म्हणू तेच खरे ही भूमिका घेतल्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज असल्याचे सांगत बेकारी,जनतेचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न तसेच आहेत. ते प्रश्न मंदिर बांधल्याने संपणार आहेत का असा सवाल देखील यावेळी बोलताना उपस्थित केला. मंदिर आणि मशीद या वादावरून तत्कालीन सरकारने माझ्यावर समन्वयक जबाबदारी सोपवली होती.
माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की,सर्व धर्मियाचे प्रतिक असलेल्या बसवेश्वर स्मारक उभा करण्या ऐवजी जातीच्या व धर्माच्या नावावर राष्ट्र उभा करतील.अशा प्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजे. विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले की,ज्यांनी मला पक्षात आणलं ते कोण आज सोबत नाही तरीही काम करत आहे.गाव तिथे शाखा उघडणार आहे.24 गावचे पाणी,बसवेश्वर स्मारक आदि प्रश्न आहेत.तरीही 300 कोटी बजेट असताना 10 हजार कोटीची कामे मंजूर केली आहेत
प्रास्ताविक चंद्रशेखर कौडूभैरी यांनी केले.सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.