मंगळवेढा

लोकप्रतिनिधीच्या हट्टामुळे मंगळवेढा भाजपा मध्ये पडली फुट! याकडे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस लक्ष देतील का?

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांच्या हट्टामुळे मंगळवेढा  तालुक्यातील भारतीय जनता पार्टी मध्ये उभी फुट पडली असून याकडे उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस लक्ष देतील   का? अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ मुळातच राष्ट्रवादीचा बाल्लेकिला म्हणून ओळखले जात होते.या मतदारसंघाचे आमदार स्व.भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त होवून पोटनिवडणुक लागले.हा मतदारसंघ भाजपाला कसे मिळेल ही रणनीत देवेंद्र फडणवीस यांनी आखले आणि त्याला यशही मिळाले. देवेंद्र फडणवीस यांचा शब्द मानून प्रशांत मालक परिचारक यांनी रात्रदिवस एक करत संपूर्ण कुटुंब व पांडुरंग परिवार ने समाधान आवताडे यांना आमदार करून देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळला.    पण थोड्या दिवसांत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागले.या निवडणूकीत सध्याचे भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व प्रशांत मालक परिचारक यांचे समर्थकांना या निवडणूकीत डावलण्यात आले.

हेच कार्यकर्ते भाजपा आमदार व महाराष्ट्रात देवेंद्रभाऊ फडणवीस हात बळकट करण्यासाठी पायाला भिंगरी लावून पळाले आणि भाजपाचा आमदार करुन राष्ट्रवादी बाल्लेकिल्याचे कायमचे नाव पुसण्याचा प्रयत्न केले. आमदार समाधान आवताडे यांच्या किरकोळ हट्टापायी ज्यानी आपल्याला आमदार करण्यात हतभार लावला त्यांनाच विसरले आणि आपल्या हातात शेतकऱ्यानी सहकारी साखर कारखाना गमावून बसले. आपल्याच पक्षातील तालूकाध्यक्ष आणि शहरध्यक्ष यांच्याकडून पराभव होवून बसले. त्यांनी प्रशांत परिचारक यांनी मनाचा मोठेपणा दाखविले असते तर आज कारखाना गेला ही नसता त्यांच्या अजूबाजूला भाजपाचा पदाधिकारीचा गराडा दिसला असता. मंगळवेढा भाजपाची “आधे इधर आधे उधर” अशी अवस्था झाली आहे. दरम्यान यावर पडदा टाकण्यासाठी साोलापुर जिल्ह्याचे भाजप खासदार यांनी देखील प्रयत्न केले होते. सोलापूर जिल्हाचे नुतन भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्यानशेट्टी यांनी पक्षाची बैठक घेऊन सक्त सुचना केल्या होत्या परंतु परिस्थिती जैसे थेच आहे. हे जर असेच चाललेले तर भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि याला जबाबदार आ.समाधान आवताडे असतील भाजपाचे पदाधिकारीच बोलतात. आगामी नगरपालिक, पंचायत समिती, जिल्हा परिषद यातील पराभव टाळण्यासाठी भाजपा एकत्रित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे असे पदाधिकारी व नागरिकांमधून बोलले जात आहे. आजी माजी आमदार समर्थकांमध्ये असलेल्या फुटीचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही जर हाच टेम्पो भविष्यात कायम राहिला तर पक्षाला 2024 ला देखील मोठी किंमत मोजावी लागण्याची परिस्थिती आहे त्या दृष्टीने आतापर्यंत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी देखील घेतलेल्या बैठकीमध्ये याची परिणाम दिसून आले मात्र त्यानंतर देखील कोणताही परिणाम सध्या या दोन्ही आजी माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये दिसून आला नाही त्यामुळे राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारे देवेंद्र फडणवीस या पक्षातील गटबाजी वर कशा पद्धतीने करेक्ट कार्यक्रम करतात याकडे सध्या तालुकावाशीयांचे लक्ष लागले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close