मंगळवेढा (प्रतिनिधी) :अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईतर्फे जानेवारी महिन्यात सोलापुरात होणाऱ्या शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी १०.३० वाजता नॉर्थकोट प्रशाला येथे करण्यात आला.या संमेलनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम यांच्या वतीने अडीच लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शतकोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील,सिनेनाट्य कलावंत भाऊ कदम,नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य तेजस्विनी कदम उपस्थित होत्या.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शतकोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड सुजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाट्य परिषद शाखा मंगळवेढाच्या वतीने अध्यक्ष डॉ. सुभाष कदम व नियामक मंडळाच्या सदस्य तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पहिले शिवार नाट्य संमेलन मोठ्या दिमाखात मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आले होते . तसेच मंगळवेढा शाखेच्या वतीने नाट्य कलावंतांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात येते.
शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनासाठी अर्थिक देणगी सोबत संमेलनादरम्यान श्रमदानासाठी मनुष्यबळ ही पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे . शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजीत कदम यांचा नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग असतो, नाट्य शिवार संमेलनाच्या सर्व खर्चचा भार उचलला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १८ व्य युवा महोत्सव मोठ्या दिमाखात पार पाडला. न भूतो, न भविष्यति असा मोठा कार्यक्रम घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .तसेच दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.