मुबई – महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचं देशात पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवा’ निमित्त विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘ वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व ‘ या ग्रंथाचे प्रकाशन तसेच ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुर्मू बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहीलेल्या महाराष्ट्रांने देशात अनेक कायदे, सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली आहे. वीरमाता जिजाऊ यांची धरती असलेल्या आणि स्त्री शिक्षणाची सुरवात करणारे महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, संसदीय लोकशाहीवर मार्गक्रमण करत असेलल्या भारताला घटना देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यासारख्या महान विभूतींचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकमहोत्सव साजरा होत असल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील जनतेचे, लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करुन राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, विधान परिषद सभागृहाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक दिशादर्शक नियम, कायदे यांची निर्मिती केली आहे. जे पुढे देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वि.स.पागे यांनी दिलेला रोजगार हमी योजनेसारखा लोकोपयुक्त कायदा ही याच विधीमंडळाची देण आहे.
वर्षनिहाय पुरस्कार विजेत्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे –
सन २०१८-१९ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य बाळासाहेब थोरात, डॉ. संजय कुटे उत्कृष्ट भाषण पुरस्कार – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा सदस्य पराग अळवणी.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य निरंजन डावखरे. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – हुस्नबानू खलिफे, सुजितसिंह ठाकूर.
सन २०१९-२० विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रकाश आबिटकर, आशिष शेलार.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सुनील प्रभू, दिलीप मोहिते-पाटील.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सतीश चव्हाण, अनंत गाडगीळ.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – रामहरी रूपनवार, श्रीकांत देशपांडे.
सन २०२०-२१ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – अमित साटम, आशिष जयस्वाल.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – प्रताप सरनाईक, प्रकाश सोळंके.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रवीण दरेकर, दिवंगत सदस्य विनायक मेटे.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य – मनीषा कायंदे, बाळाराम पाटील.
२०२१-२२ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य संजय शिरसाट, प्रशांत बंब.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सरोज अहिरे, सिद्धार्थ शिरोळे.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत,
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – गोपीकिशन बाजोरिया, विक्रम काळे
सन २०२२-२३ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य भरत गोगावले, चेतन तुपे, समीर कुणावार. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य यामिनी जाधव, अभिमन्यू पवार.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार -सदस्य बाबाजानी दुर्राणी, प्रज्ञा सातव.
सन २०२३-२४ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य रमेश बोरनारे, अमिन पटेल, राम सातपुते.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य कुणाल पाटील, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रमेश पाटील.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, सुनील शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.