मंगळवेढा तालुक्यातील टेंभू म्हैसाळ योजनेतील उर्वरित गावाचा पाणीवितरण बाबत चर्चा सत्र व शेतकरी संवाद

मंगळवेढा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते

मंगळवेढा(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर दिनांक 6ऑक्टोबर 2023 रोजी येणार असून मंगळवेढा शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 11वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच मंगळवेढा तालुक्यातील टेंभू-म्हैसाळ योजनेतील उर्वरित गावांचा पाणी वितरण प्रश्न बाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हुन्नूर ता.मंगळवेढा येथे शेतकरी संवाद व पाणी वितरण बाबत सविस्तर चर्चा सत्र होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी दिली.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, तसेच राष्ट्रवादीचे शेखर माने, मंगळवेढा राष्ट्रवादीचे प्रतिक सदस्य राहुल शहा, सहसचिव प्रदेश विजयकुमार खवतोडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय पाटील, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष मुजम्मील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, महिला तालुकाध्यक्ष संगीताताई कट्टे-पाटील, माणिक गुंगे यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.