मनसेची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी दिलीप धोत्रे यांना जाहीर!

सोलापुर(प्रतिनिधी)मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असताना मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये, राज ठाकरे यांचे खास आणि मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या मुंबईतील बाळा नांदगावकर यांना तर दुसरी उमेदवारी दिलीप धोत्रे यांना जाहीर करण्यात आली आहे.                                                                                         बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतील शिवडी विधानससभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी विधानससभेतून सध्या ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहेत तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे आमदार आहेत. मनसेकडून उमेदवारी जाहीर झालेले दिलीप धोत्रे यांना देण्यात आले.

 

दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असून विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दिलीप धोत्रे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून ते मूळ शिवसैनिक आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला, उत्तम संघटन कौशल्य असल्याने शिवसेना ते मनसे असा त्यांचा प्रवास चढत्या क्रमाने झाला. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता.

 

धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी मनसेमध्ये पार पाडली आहे. त्यानंतर, नुकेतच त्यांना पक्षात नेतेपदही देण्यात आले आहे.

दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी 2009 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. नंतरच्या काळात धोत्रे यांनी कामगार शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नावर अनेकवेळा आवाज उठवत आंदोलने केली. कोविडच्या काळातही त्यांनी मोठे काम केल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांचा मोठा मतदार वर्ग तयार झालेला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन राज ठाकरेंनी त्यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.                       लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्येही ते महायुतीसोबत असणार का, अशी चर्चा सुरु होती. पण, त्यांनी दिलेला पाठिंबा फक्त लोकसभेपुरता मर्यादीत होता असं स्पष्ट केलं आहे. आता, विधानसभेला २०० ते २५० उमेदवार उभे करण्याची तयारी राज ठाकरे यांनी सुरु केली आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.