अवैध धंदे रखडलेला तपासावरून पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी धरणे आंदोलन!

मंगळवेढा(प्रतिनिधी) येथील पोलीस ठाण्याचा दुसऱ्यांदा पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक रणजित माने कार्यकालात अवैध व्यवसायात वाढ होत अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यात अपयश आल्याने या प्रकरणी निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांच्या वतीने पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

या आंदोलनात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे,पाठखळचे सरपंच ऋतुराज बिले, निबोणीचे सरपंच बिरुदेव घोगरे,दिलीप उघाडे,संजय जगताप,अमित गवळी धन्यकुमार पाटील,संभाजी लवटे,सर्जेराव गाडे,सिध्देश्वर हेंबाडे,तात्या घोडके,राम ताड,महादेव ताड, मनोज चव्हाण, धनंजय पवार,सहभागी झाले.                                    याबाबतचे निवेदन पोलीस महासंचालक यांना देण्यात आले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 12 जानेवारी 2022 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घेतल्यानंतर तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या अनेक घरफोड्या झाल्या आहेत, त्यापैकी बऱ्याचशा घरफोड्यांचा अद्याप तपास लागला नाही, निंबोणी येथील कामू पाटील यांचा खून होऊन एक वर्ष उलटले तरीही अर्थीक तडजोड करून खुनाचा गुन्हा दाखल न करता, आरोपीना मोकाट सोडून दिले, परप्रांतीय चार वर्षीय रणवीरकुमार साहू या बालकाचे दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी

अपहरण झाले त्याचाही अ‌द्याप तपास लागला नाही. तालुक्यामध्ये अवैद्य मटका अवैध गुटखा, अवैध दारू, अवैध वाळू वाहतूक, अवैधरित्या कत्तल खाण्याला जाणाऱ्या जनावराची वाहतूक, शेजारीच असलेल्या कर्नाटक राज्यातून होणारी गुटख्याच्या वाहनांची वाहतूक,तीन ते चार ठिकाणी वेश्या व्यवसायाचे अड्डे सुरू करण्यास मंथली हप्ते घेत असल्याची तक्रार केल्यानंतर महामार्गावरील हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज वर चालणाय्रा वेश्याव्यवसायावर कारवाई केली. त्यामुळे अनेक गंभीर होण्याचा तपास लावण्यात त्यांना अपयश आले पोलीस निरीक्षक माने हे जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचे अनेक राजकीय पुढाऱ्याशी संबंध असल्यामुळे त्या माध्यमातून ते दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या निवेदनात नमूद केले.

                                                                  आंदोलनकर्त्यांच्या तक्रार अर्जातील मागणी बाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

 डाॅ.अर्जुन भोसले प्र.उपविभागीय पोलिस अधिकारी

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.