मंगळवेढाशैक्षणिक

“मुले ही देवा घराची फुले’असून लहान मुलांना देवाचे रूपही मानले जाते-डॉ.प्रिती शिर्के

मंगळवेढा (प्रतिनिधी) मुले ही देवा घराची फुले’ असं असून लहान मुलांना देवाचे रूपही मानले जाते. पंडित नेहरूनी मुले देशाचे भविष्य असल्याचे म्हणत मुलांच्या शिक्षणासाठी आणि चांगल्या जीवनासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिल्याचे डाॅ प्रिती शिर्के म्हणाल्या.प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयात बालदिनाचे औचित्य साधून शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड आय.सी.यु. एल.एल.पी. आणि इनर व्हिल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वय वर्षे 5 वयोगटातील मुलां-मुलींकरिता “रंगभरण” स्पर्धा आयोजित करण्यात आले. रंगभरण स्पर्धेत एकूण 60 मुलां-मुलींनी सहभाग नोंदविला होता. बालदिनाचे औचित्य साधून प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय फुले व फुग्यांनी सजविण्यात आले.डॉ.प्रिति शिर्के आणि सुनंदा आवताडे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार यांनी दोघांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. त्यानंतर रंगभरण स्पर्धेत रेणुका मनोजसिंह राजपुरोहित (प्रथम क्रमांक), कु. स्वरा महेश पारवे (व्दितीय क्रमांक), श्रावणी उमेश पारवे (तृतीय क्रमांक), कृष्णा सचिन शिंदे (उत्तेजनार्थ), मनस्वी अजित सावंजी (उत्तेजनार्थ) या विजेत्यांचा डॉ.प्रिति शिर्के व सुनंदा आवताडे यांच्या हस्ते पॅड, चित्रकला वही, पेन्सील, खोडरबर, पट्टी इत्यादी शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला तर सहभागी मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी बोलताना डाॅ शिर्के म्हणाल्या की प्रायमा ही मंगळवेढा तालुक्यात एकमेव पूर्व प्राथमिक विद्यालय आहे की नवनवीन सोयी सुविधा उपलब्ध करुन सदैव तत्पर असते. यामुळेच प्रायमा ही पालकांची प्रिय शाळा बनलेली आहे. प्रायमामध्ये मुलां-मुलींना प्रवेश घेतले की पालक खरोखरीच समाधानी असतात. इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा सुनंदा आवताडे म्हणाल्या, प्रायमामध्ये माझे नात नातू सध्या शिकत आहेत. खरोखरीच प्रायमामध्ये आल्यापासून नात नातू यांच्या अभ्यास, बोलणे यामध्ये खूपच बदल झालेला आहे. तसेच रंगभरण स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष नीलकंठ कुंभार,सचिवा वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका सविता रत्नपारखी, लता कुलकर्णी, पूजा ढोणे, सुनिता कुंभार, निता डोके, गीता गुंगे, सीमा सुर्यवंशी, मदतनीस सुजाता मुदगूल, शिला पलंगे, सुजाता चिंचकर यांनी परिश्रम घेतले. रंगभरण स्पर्धेचे परीक्षण मनोजकुमार वेदपाठक यांनी केले, सुत्र संचालन व आभार काजल वाघमारे यांनी मानले.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close