मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढाच्या वैभवशाली विकासात धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा मोठा हातभार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी व्यक्त केले.ते श्री सद्गुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मंगळवेढा या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे,दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत,जकराया शुगरचे अध्यक्ष बिराप्पा जाधव,श्री सद्गुरू सिताराम महाराज शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड,उपाध्यक्ष तानाजी खरात, उद्योजक वैभव नागणे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे,धनश्री महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा. शोभा काळुंगे,अजित जगताप,नानासाहेब लिगाडे,भागवत माने, सतीश जगताप, रामचंद्र जगताप, रामकृष्ण नागणे, युवराज गडदे,यादाप्पा माळी, उषा माने,लक्ष्मण वाघमोडे, राधिका पाटील, सीमाताई काळुंगे आदीसह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हा उपनिबंधक भोळे म्हणाले की,सहकार क्षेत्रात कार्यरत असताना संचालक मंडळाने सर्व कायदेशीर बाबी समजून घेऊन बँकचे कामकाज करणे नितांत गरजेचे आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा मानस असावा.सर्वसामान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री व सिताराम परिवाराने वाटचाल सुरू ठेवली आहे. मंगळवेढाच्या वैभवशाली विकासात धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा मोठा हातभार आहे. त्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे यांनी सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा संस्था उभा केली आहे.याप्रसंगी मा. आ. दत्तात्रय सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, प्रा शिवाजीराव काळुंगे आदींची भाषणे झाली.प्रास्ताविक श्री सद्गुरू सिताराम महाराज शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले व अक्षय टोमके यांनी केले.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.