मंगळवेढा(प्रतिनिधी) सध्याच्या काळातील मुलीचा घटता जन्मदर चिंताजनक असून मुलीच्या जन्माचा तिरस्कार न करता आई वडिलांनी स्वागत करावे,शासन देखील आपल्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारूळे यांनी केले.
दोन मुलीवर कुटुंब नियोजन केलेल्या तालुक्यातील पाच लाभार्थ्यांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेतील 25 हजार रू मुदतठेव प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, तालुका समन्वयक आदित्य शिंदे, वरिष्ठ सहाय्यक माणिक पाटील,पर्यवेक्षका अनुराधा शिंदे, कल्पना आठवले,छाया शिंगाडे,ज्योती राठोड,सुरेखा साळवे,आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बालविकास अधिकारी गारूळे म्हणाले की सध्या काळात मुलीचा जन्मदर घटल्याने विवाहासाठी इच्छुक असलेल्यांना मुली मिळत नाही.त्यामुळे त्यांना लग्नासाठी मुली द्या म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनालाच मुली द्या असे म्हणावे लागले.आज अशी परिस्थिती आहे तर भविष्यात आणखी बिकट समस्या होणार आहे.तालुक्यात ही मुलीचा जन्मदर कमी आहे आई वडीलांनी मुलगी जन्माला आली म्हणून नाराज न होता तिचे स्वागत करा मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत,फक्त तिला शिकवा,एका मुलीवर कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्याने दोन वर्षात तर दोन मुलीवर कुटुंब नियोजन दाम्पत्याने एक वर्षात गावातील अंगणवाडी सेविका व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून अर्ज देण्यात यावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतके निश्चित केल्याने सर् घटकाला याचा लाभ घेता येईल.तालुक्यातील आणखी 30 लाभार्थ्यांला या योजनेतून लाभ देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच त्यांना मंजूरी मिळणार आहे.त्या मुलीच्या नावे माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून 25 हजाराची मुदतठेव शासन करून देत असल्याने तिच्या भविष्याची व शिक्षणाची चिंता करू नये असे आवाहन बालविकास अधिकारी गारूळे यांनी सांगितले.