आवताडे शुगरचे चालू हंगामातील ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा -चेअरमन संजय आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. नंदुर. या साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये गळीतास आणलेल्या उसाचे सर्व बिल ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खाजगी कारखानदारी मध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. या साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना 2350 रुपये उच्चांकी दर दिला असुन वाहतूक ठेकेदार यांची उर्वरित बिले हि चालू आठवड्यात पुर्ण आदा केली जातील.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला हा साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे शेतकरी व ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी अनुभवाच्या  जोरावर कारखाना प्रशासनातील मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे यांचे कामाचा कुशल अनुभवाचा जोरावर, अधिकारी व कर्मचारी यांच्या कुशल कामगिरीने कारखान्याने पहिल्याच हंगामात चार लाख तीन हजार मे.  टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे.    पुढील हंगामात ही असेच विक्रमी ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा टीमचा प्रयत्न असेल असे चेअरमन संजय आवताडे यांनी बोलताना सांगितले .

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.