आ आवताडे-परीचारकांच्या प्रयत्नाने पंढरपूर नामसंकीर्तन सभागृहाच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी २० कोटींचा निधी केला मंजूर

मंगळवेढा(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेमधील नामसंकीर्तन सभागृहातील विविध बाबींच्या विकासासाठी २० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की प्रशांत परिचारक व मी मिळून पंढरपूर शहरातील भौतिक आणि सांप्रदायिक वैभवाचे प्रतिक असणाऱ्या या सभागृहाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे – पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा आणि पत्रव्यहार केला होता. २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारकडून मंजूरी मिळाली होती त्यावेळेस २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता मंजूर झालेल्या निधीमधून सदर नामसंर्कितन सभागृहाचे बांधकाम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे. मात्र उर्वरित निधी सध्या मिळाला आहे.
देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूर शहरासाठी आणि भागवत धर्माचे पाईक असणाऱ्या वारकरी भक्तांच्या किर्तन अस्मितेसाठी आवश्यक असणारे नामसंकीर्तन सभागृह या निधीमुळे देखण्या रूपामध्ये पंढरी नगरीमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर वर्षभर विविध वारीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये कीर्तनसेवा करणाऱ्या भाविकांना व कीर्तनकार मंडळींना या सभागृहामुळे अध्यात्मिक विचारांची मांडणी करण्यासाठी सुलभ आणि प्रशस्त व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे आ .आवताडे म्हणाले .

सदर निधी अंतर्गत पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहामध्ये उपलब्ध होणाऱ्या सोयी – सुविधा पुढील प्रमाणे – सभागृहामध्ये आधुनिक पद्धतीने विद्युत व्यवस्था करणे, भव्य ऑडिटोरियम रूम ची निर्मिती करणे, सुबक पद्धतीने ड्रेनेज व्यवस्था करणे, पाणी व्यवस्था करणे, अंतर्गत रस्ते, लँडस्केपिंग आधी सुविधांची निर्मिती होणार आहे.

 

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.