आ आवताडेंच्या माध्यमातून महमदाबादच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी- सरपंच सुवर्णा नवत्रे

मंगळवेढा(प्रतिनिधी) महमदाबाद (शे) तालुका मंगळवेढा गावच्या विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सुमारे चार कोटीच्या आसपास निधी मिळाला असून छोट्याशा गावाला त्यांनी मुबलक निधी देत गावच्या विकासाला गती दिली असल्याचे मत सरपंच सुवर्णा दत्तात्रय नवत्रे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना सरपंच सुवर्णा नवत्रे म्हणाल्या की आमदार समाधान आवताडे यांचेकडे ज्या कामांची मागणी केली त्या सर्व कामांना त्यांनी तात्काळ निधी देत कामे मंजूर करून दिली आहेत,वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला महमदाबाद(शे)-गुंजेगाव रस्त्यावरील उजनी कॅनॉलवरचा 2 कोटींचा पूल त्यांनी मंजूर करून काम सुरू केले असून  त्या पुलामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर ही गावाला सुरू नसलेली एसटीची सोय सुरू होण्यास या पुलाचा उपयोग होणार आहे तालुक्यात सध्या मान नदीकाठच्या गावावरून सांगोला ते मंगळवेढा अशी एसटीची सोय सुरू करावी अशी ही मागणी केली असून मान नदीकाठच्या मंगळवेढा-देगाव-घरनिकी-मारापुर-गुंजेगाव-महमदाबाद-देवळे-सावे-बामणी-सांगोला अशा मार्गाने लवकरच एस टी ची सोय करून विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय संपवण्याचे आश्वासनही आ समाधानदादांनी दिले आहे. त्याचबरोबर गावाला दिवसा शेतीसाठी विद्युत पुरवठा व्हावा यासाठी गावच्या हद्दीत असलेल्या सरकारी जागेवर सोलर प्लांट उभारणीसाठी प्रस्ताव दाखल केला असून तो प्रस्ताव ही मंजूर झाला आहे त्यामुळे काही महिन्यातच गावाला दिवसभर शेतीचा विद्युत पुरवठा होणार आहे.

 आमच्या गावच्या विकासासाठी आ समाधान दादांनी आतापर्यंत महमदाबाद ते गुंजेगाव रस्त्यावरील कॅनॉलवर क्रॉसिंग पूल बांधणे 2 कोटी,जलजीवन नळ पाणीपुरवठा योजना 90 लाख,

नरळे वस्ती येथे म्हसोबा मंदिर सभामंडप 7 लाख,गावठाण मध्ये अभ्यासिका बांधणे 10 लाख,बसवेश्वर मंदिराशेजारी सांस्कृतिक भवन बांधणे 7 लाख,कांबळे वस्ती शाळेत अंगणवाडी बांधणे 11.25 लाख, त शेटफळ बंधारा रस्ता 22 लाख,

बसवेश्वर मंदिरासमोर निवारा शेड बांधणे 7.50 लाख, बसवेश्वर मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे 5 लाख, बसवेश्वर मंदिरासमोर काँक्रिट करणे 3 लाख,कांबळे वस्ती शाळा दुरुस्ती करणे 2.38 लाख, गावठाण नवीन शाळा दुरुस्ती करणे 2.38 लाख,जुनी शाळा दुरुस्ती 3 लाख, प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे 2 लाख,आंधळगाव विशेष रस्ता दुरुस्ती करणे 3 लाख, आंधळगाव रस्ता खडीकरण 3 लाख,नवबौद्ध वस्तीत पाणी फिल्टर बसविणे 3.5 लाख, अंगणवाडी किचन शेड बांधणे 1 लाख, कांबळे वस्ती शाळेत पाणीपुरवठा 1.35 लाख रुपये,

गावठान मध्ये पाणीपुरवठा सोय करणे 1.45 लाख

ऐवळे वस्ती येथे पाणीपुरवठा करणे 2 लाख अशी अनेक कामे मंजूर असून अनेक कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत या कामांबरोबरच महमदाबाद हे आमच्या गावचे मुघलकालीन नाव बदलण्याचा प्रस्ताव ही आ समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पाठविला असून गावचे नाव बदलण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे  मंजुरीसाठी पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर माजी उपसभापती धनंजय पाटील,पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार,जिल्हा परिषदेचे माजीबउपाध्यक्ष दिलीप चव्हाण,समाज कल्याणचे माजी सभापती शीलाताई शिवशरण यांचे सहकार्य लाभले आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.