मंगळवेढा(प्रतिनिधी) महमदाबाद (शे) तालुका मंगळवेढा गावच्या विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सुमारे चार कोटीच्या आसपास निधी मिळाला असून छोट्याशा गावाला त्यांनी मुबलक निधी देत गावच्या विकासाला गती दिली असल्याचे मत सरपंच सुवर्णा दत्तात्रय नवत्रे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना सरपंच सुवर्णा नवत्रे म्हणाल्या की आमदार समाधान आवताडे यांचेकडे ज्या कामांची मागणी केली त्या सर्व कामांना त्यांनी तात्काळ निधी देत कामे मंजूर करून दिली आहेत,वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला महमदाबाद(शे)-गुंजेगाव रस्त्यावरील उजनी कॅनॉलवरचा 2 कोटींचा पूल त्यांनी मंजूर करून काम सुरू केले असून त्या पुलामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर ही गावाला सुरू नसलेली एसटीची सोय सुरू होण्यास या पुलाचा उपयोग होणार आहे तालुक्यात सध्या मान नदीकाठच्या गावावरून सांगोला ते मंगळवेढा अशी एसटीची सोय सुरू करावी अशी ही मागणी केली असून मान नदीकाठच्या मंगळवेढा-देगाव-घरनिकी-मारापुर-गुंजेगाव-महमदाबाद-देवळे-सावे-बामणी-सांगोला अशा मार्गाने लवकरच एस टी ची सोय करून विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय संपवण्याचे आश्वासनही आ समाधानदादांनी दिले आहे. त्याचबरोबर गावाला दिवसा शेतीसाठी विद्युत पुरवठा व्हावा यासाठी गावच्या हद्दीत असलेल्या सरकारी जागेवर सोलर प्लांट उभारणीसाठी प्रस्ताव दाखल केला असून तो प्रस्ताव ही मंजूर झाला आहे त्यामुळे काही महिन्यातच गावाला दिवसभर शेतीचा विद्युत पुरवठा होणार आहे.
आमच्या गावच्या विकासासाठी आ समाधान दादांनी आतापर्यंत महमदाबाद ते गुंजेगाव रस्त्यावरील कॅनॉलवर क्रॉसिंग पूल बांधणे 2 कोटी,जलजीवन नळ पाणीपुरवठा योजना 90 लाख,
नरळे वस्ती येथे म्हसोबा मंदिर सभामंडप 7 लाख,गावठाण मध्ये अभ्यासिका बांधणे 10 लाख,बसवेश्वर मंदिराशेजारी सांस्कृतिक भवन बांधणे 7 लाख,कांबळे वस्ती शाळेत अंगणवाडी बांधणे 11.25 लाख, त शेटफळ बंधारा रस्ता 22 लाख,
बसवेश्वर मंदिरासमोर निवारा शेड बांधणे 7.50 लाख, बसवेश्वर मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे 5 लाख, बसवेश्वर मंदिरासमोर काँक्रिट करणे 3 लाख,कांबळे वस्ती शाळा दुरुस्ती करणे 2.38 लाख, गावठाण नवीन शाळा दुरुस्ती करणे 2.38 लाख,जुनी शाळा दुरुस्ती 3 लाख, प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे 2 लाख,आंधळगाव विशेष रस्ता दुरुस्ती करणे 3 लाख, आंधळगाव रस्ता खडीकरण 3 लाख,नवबौद्ध वस्तीत पाणी फिल्टर बसविणे 3.5 लाख, अंगणवाडी किचन शेड बांधणे 1 लाख, कांबळे वस्ती शाळेत पाणीपुरवठा 1.35 लाख रुपये,
गावठान मध्ये पाणीपुरवठा सोय करणे 1.45 लाख
ऐवळे वस्ती येथे पाणीपुरवठा करणे 2 लाख अशी अनेक कामे मंजूर असून अनेक कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत या कामांबरोबरच महमदाबाद हे आमच्या गावचे मुघलकालीन नाव बदलण्याचा प्रस्ताव ही आ समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पाठविला असून गावचे नाव बदलण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे मंजुरीसाठी पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर माजी उपसभापती धनंजय पाटील,पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार,जिल्हा परिषदेचे माजीबउपाध्यक्ष दिलीप चव्हाण,समाज कल्याणचे माजी सभापती शीलाताई शिवशरण यांचे सहकार्य लाभले आहे.