मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा तालुक्याच्या सिमावर्ती भागातील हुन्नूर ते भोसे या सीमेवरील चौगुले वस्तीवर 3 किलोमीटरचा रस्त्यासाठी 30 वर्षे प्रतीक्षा करूनही मार्गी न लागल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या पुढाकाराने या भागातील लोकांना सोबत घेऊन स्वत खर्च करत मार्गी लावला. हुन्नूर-भोसे रस्त्यावरील चौगुले वस्ती पासून ते हुन्नूर हे 3 किलोमीटर अंतर असून या परिसरामध्ये 70 कुटुंबे या ठिकाणी राहत असून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी कसलाच रस्ता नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.अनेक वर्ष मागणी करून देखील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने या भागातील नागरिकांतून संताप व्यक्त केला. मात्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी या भागातील शेतकऱ्यांना एकत्र बसून स्वखर्चाने हा रस्ता बनवून देण्याची तयारी दर्शवत तातडीने जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केल्याने गेली तीस वर्षे रस्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चौगुले वस्ती परिसरातील 300 ग्रामस्थांचे व भोसे परिसरात शेतकऱ्यांची रस्त्यामुळे मोठी सोय होणार आहे याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्याबरोबर पुंडलिक साळे, बिराप्पा पुजारी, संतोष शिरसागर, अरुण इंगोले ,उत्तम चोपडे ,अन्नसो खडतरे ,बन्सीलाल खडतरे, आप्पासो निकम, कुमार चौगुले, संतोष चौगुले, श्रीमंत चौगुले, महादेव पाटील, बंडू खडतरे, गणेश खडतरे, मनोहर निकम, सचिन निकम ,महेश खडतरेड, विलास खडतरे, प्रवीण चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
———-
गेली 30 वर्षे झाले आमचा गावात जाणाऱ्या रस्त्यासाठी संघर्ष सुरू होता प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन मिळत होते परंतु प्रत्यक्षात रस्ता होत नव्हता काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी आमच्या रस्त्याचा प्रश्न स्वखर्चाने मार्गी लावल्याने चौगुले वस्ती वरील विध्यार्थी व ग्रामस्थाची सोय झाली.
कुमार चौगुले ग्रामस्थ हुन्नूर
——–
सीमा वरती भागातील दोन गावाला जोडणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय माझ्या कानावर आल्यानंतर त्यासाठी मी पुढाकार घेऊन त्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आणि त्यांना ये -जा करण्याचा मार्ग सोयीस्कर झाला.
प्रशांत साळे तालुकाध्यक्ष काँग्रेस